गांधीनगर - गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गांधीनगरमधील एमबीबीएसची एक 20 वर्षीय विद्यार्थीनी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने निराश झाली होती. निराशेच्या गर्तेत तिने वसतिगृहाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली ( MBBS Student Suicide In Gandhinagar ) आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ही 20 वर्षीय तरुणी गांधीनगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिने वसतिगृहाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान घडली आहे. कॉलेजच्या डीन शोभना गुप्ता यांनी सांगितले की, तरुणी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत होती. मुलीने एनआरआय कोट्यातून प्रवेश घेतला होता. तिला परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.