महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओव्हरब्रिजवरुन कोसळून तरुणीचा मृत्यू; सेल्फी घेताना अपघात झाल्याचा संशय - इंदूर तरुणी ओव्हरब्रिज मृत्यू

या पुलावर यापूर्वीही अशा घटना झाल्याचे समोर आले आहे. सेल्फी घेण्याच्या प्रयत्नामध्ये या तरुणीचा अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यानंतर तपासाला एक दिशा येता येईल.

mbbs-student-dies-after-falling-from-over-bridge-in-indore
ओव्हरब्रिजवरुन कोसळून तरुणीचा मृत्यू; सेल्फी घेताना अपघात झाल्याचा संशय

By

Published : Jun 13, 2021, 7:12 PM IST

इंदूर : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका तरुणीचा ओव्हर ब्रिजवरुन कोसळून मृत्यू झाला. ही तरुणी वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) घेत होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती सायंकाळी आपल्या भावासोबत फिरायला गेली होती. यावेळी अचानक ती पुलावरुन कोसळली. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.

नेहा नावाची ही तरुणी सागर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. सध्या लॉकडाऊनमुळे ती आपल्या घरी आली होती. शनिवारी सायंकाळी ती आपल्या भावासह राजेंद्र नगरला असलेल्या ओव्हरब्रिजवर फिरायला गेली होती. यावेळी तिचा भाऊ खाली असलेल्या एका दुकानातून खायचे सामान आणण्यासाठी गेला. तो पुन्हा ब्रिजवर पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की नेहा खाली पडली आहे. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

ओव्हरब्रिजवरुन कोसळून तरुणीचा मृत्यू; सेल्फी घेताना अपघात झाल्याचा संशय

सेल्फी घेताना अपघात झाल्याचा संशय..

या पुलावर यापूर्वीही अशा घटना झाल्याचे समोर आले आहे. सेल्फी घेण्याच्या प्रयत्नामध्ये या तरुणीचा अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यानंतर तपासाला एक दिशा येता येईल.

या पुलाला तीन फूट उंच रेलिंग आहे. त्यामुळे यावर चढून किंवा रेलिंगला टेकून सेल्फी घेताना तरुणी खाली कोसळली असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासोबतच, ही आत्महत्या आहे का या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :कर्नाटक : ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून २९० कोटींची फसवणूक; ११ जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details