महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Politics : एकनाथ शिंदे यांची भेट पडली महागात.. मायावतींकडून बसपाच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

समाजवादी पक्षाचे प्रमुख मायावती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱया समाजवादीच्या बड्या नेत्यांना चांगलाच दणका दिला आहे. मायावती यांना उत्तर प्रदेशमध्ये तीन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

mayawati expelled former ministers
एकनाथ शिंदे यांची भेट पडली महागात

By

Published : Apr 10, 2023, 12:38 PM IST

Updated : Apr 10, 2023, 1:02 PM IST

मायावतींकडून बसपाच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

लखनौ : उत्तर प्रदेशच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते राज किशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रिजकिशोर सिंह यांची यांनी तत्काळ हकालपट्टी केली. हे दोन्ही नेते अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फिरताना दिसून आल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. बसपा, सपा आणि काँग्रेस या पक्षांमध्ये राहून दबदबा निर्माण करणारे राज किशोर सिंह आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्येला आले होते. बसपाच्या दोन्ही नेत्यांनी अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. माजी मंत्री राज किशोर सिंह यांचे भाऊ ब्रिज किशोर सिंह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसून आले. त्यानंतर संतापलेल्या मायावती यांनी दोन्ही माजी मंत्री बंधूंना पक्षातून काढले आहे.

बसपा हा पक्ष म्हणजे बुडणारी बोट-माजी मंत्री राजकिशोर सिंह हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, की बसपा हा पक्ष म्हणजे बुडणारी बोट आहे. त्यामुळे अशा बोटीतून वेळीच उतरणे योग्य ठरणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पूर्वांचलमध्ये राजकिशोर सिंह यांचा दांडगा जनसंपर्क आहे. बसपातून हकालपट्टी केल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बसपाने काय म्हटले आहे पत्रात-दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधण्याचा फटका सहन करावा लागला आहे. मायावतींना त्यांची शिंदेबरोबरील जवळीक आवडली नाही. बसपाचे जिल्हाध्यक्ष जयहिंद गौतम यांनीही या संदर्भात एक पत्र जारी केले आहेत. त्यामध्ये पक्षाध्यक्षांच्या सूचनेनुसार माजी कॅबिनेट मंत्री राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ आणि माजी राज्यमंत्री ब्रिजकिशोर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. या दोघांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळून आल्याचेही पत्रात म्हटले आहे. उत्तर प्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली.

हेही वाचा-Met CM Shinde and Yogi Adityanath: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् योगी आदित्यनाथ यांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा

Last Updated : Apr 10, 2023, 1:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details