नवी दिल्ली -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विद्यार्थ्यांच्या परीक्षा खोळंबत आहेत. अभियांत्रिकीची प्रवेशपूर्व परीक्षा असलेली जीईई-मेन्स कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली आहे.
जीईई-मेन्स ही 24 मे ते 28 मे दरम्यान होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जीईई-मेन्स पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यालयीन आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) काढले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात नियोजित असलेल्या जीईई-मेन्सचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचेही एनटीएने म्हटले आहे. मे महिन्यातील सेशनसाठी नोंदणी पुढील टप्प्यात जाहीर करण्यात येणार असल्याचेही एनटीएने म्हटले आहे.
हेही वाचा-दिल्लीमधील बेस रुग्णालयाला ऑक्सिजनचा कमी पुरवठा; सैन्यदलाची सरकारकडे तक्रार