फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) -फिरोजाबाद जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. ( Firozabad Accident Five Died ) हे सर्व जण एक बटाट्याने भरलेल्या मॅक्स वाहनात प्रवास करत होते. हे वाहन जसराना वरुन आगरा येथे जात होते. हे वाहन रस्त्यात पंक्चर झाले होते. याचवेळी या वाहनाला अनियंत्रित कंटेनरने धडक दिली. ही घटना आग्रा कानपूर राष्ट्रीय महामार्गावर टुंडला पोलीस स्टेशन परिसरात घडली.
पाच जणांचा मृत्यू - घटनेनुसार, बटाट्याने भरलेला मॅक्स हा फिरोजाबादच्या जसराना भागातून आगऱ्याकडे जात होता. कारमध्ये बरेच लोक होते. लोडर मॅक्स वाटेत पंक्चर झाली. त्यामुळे चालकाने तुंडला पोलीस स्टेशन हद्दीतील टोल प्लाझा जवळील पंक्चर जोडण्याच्या दुकानात कार उभी केली होती. जेथे मिस्त्री बाली मोहम्मद यांचा मुलगा खुदा बक्श रा. पोखरवाला सादाबाद जिल्हा हातरस हा पंक्चर जोडत होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरचा ताबा सुटून मॅक्स या लोडरवर आदळला. या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी तुंडला पोलिसांना दिली. पोलिसांनी मॅक्समध्ये अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यापैकी चार जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.