महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mathura Road Accident : दिल्लीहून बिहारला जाणारी बस दुभाजकाला धडकून उलटली; ३ जणांचा जागीच मृत्यू

मथुरा येथे रविवारी रात्री उशिरा अपघात झाला. यमुना एक्सप्रेस वेवर बस उलटली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अन्य २२ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मथुराचे जिल्हा दंडाधिकारी पुलकित खरे यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Mathura Road Accident
बस दुभाजकाला धडकून उलटली

By

Published : Feb 27, 2023, 9:07 AM IST

बस दुभाजकाला धडकून उलटली

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : मथुरा जिल्ह्यातील सुरीर पोलीस स्टेशन हद्दीतील यमुना एक्स्प्रेस वेवर रविवारी रात्री उशिरा दिल्लीहून बिहारला जाणारी बस भरधाव वेगात पलटी झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बस पलटी होऊन 3 जणांचा मृत्यू झाला, तर बसमधील 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसर पोलीस आणि यमुना एक्सप्रेस वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दहा वर्षीय मुलाचा समावेश : मथुराचे जिल्हा दंडाधिकारी पुलकित खरे यांनी सांगितले की, मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. गंभीर जखमी प्रवाशांना आग्रा एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय अरुण, २५ वर्षीय शिवाजीराव, २१ वर्षीय वीरेंद्र राम, ५५ वर्षीय लीलावती, राम चंद्र, आदित्य कुमार (६ वर्षे) यांना आग्रा येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालक दारूच्या नशेत होता, त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस यमुना एक्सप्रेस वेवर पलटी झाली. जखमींची प्रकृती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाड आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

सीतापूर अपघात : उत्तर प्रदेश जिल्ह्यातील सिधौली कोतवाली परिसरातील महामार्गावर रविवारी बिअरने भरलेला ट्रक डिव्हायडरला धडकून उलटला. अहमदपूर येथे झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार आणि ट्रक चालक ट्रक खाली दबले गेले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी क्रेनच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. या अपघाताने परिसरात तासभर वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी, माणुसकीला लाजवेल असे दृश्य पहायला मिळाले, मृतांना ट्रक खालून बाहेर काढण्याऐवजी रस्त्यावरून जाणारे लोक बिअरच्या बाटल्या नेत होते. मोहम्मद अहमद असे मृतकाचे नाव आहे.

अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू : चिन्हाट येथे दुचाकी बसच्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याशिवाय आणखी एक जखमी झाल्याची माहिती आहे. तनिष्क (18)असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एका खासगी विद्यापीठात बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत होता. तनिष्क कथुटा परिसरात राहत होता. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास तिवारीगंजकडे जात असताना अपघात झाला. तिवारीगंजजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने त्याला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा :Hyderabad Murder Case : मित्राच्या गर्लफ्रेंडवर करायचा प्रेम अन् मित्रानेच केला त्याचा गेम; मृतदेहासोबत घेतला सेल्फी

ABOUT THE AUTHOR

...view details