शामली (उत्तरप्रदेश) -जिल्ह्यातील कैराना येथील फटाख्याच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत जवळपास सातपेक्षा जास्त जण हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी हे घटना स्थळावर पोहोचले असून रेस्क्सू सुरू आहे.
घटनास्थळावरून जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया कारखान्यात भीषण स्फोट -
दिवाळी उत्सवाला नजरेसमोर ठेऊन शामली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फटाख्याचे कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यातील जनपद परिसरातील कैराना येथे अशाच एक कारखाना सुरू होता. त्या कारखान्यात आज (शुक्रवार) संध्याकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका मोठा होता की, या स्फोटात कारखान्याची छत आणि दरवाजे हे कोसळले आहेत. स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर 7 पेक्षा जास्त लोक हे गंभीर जखमी झाले आहेत.
नेमके काय झाले -
कैराना ग्रामपंचायत क्षेत्रातील जगनपूर रोडवरील एका कारखान्यात हा स्फोट झाला आहे. हा कारखाना राशिद नावाच्या व्यक्तीचा होता असे सांगितले जात आहे. शुक्रवारी कारखान्यात मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. यावेळी अचानक फटाक्याच्या दारूचा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की, कारखान्यात काम करणाऱ्या लोकांच्या शरीराच्या चिंथड्या उडाल्या होता. तर काही कामगार हे गंभीररित्या जखमी झाले. घटनास्थळी आढळलेल्या मृतदेहावरून तीन जणांचा मृत्यू झाल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. तर 7 जण हे जखमी झाले आहेत, यापैकी 3 जण हे गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू -
फटाखा कारखाना झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. दमकल विभागाची पथकेही घटनास्थळावर पोहोचली आहेत. अद्याप एसडीएम कैराना उद्भव त्रिपाठींच्या नेतृत्वात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी असलेल्या कामगारांची संख्या अद्याप जिल्हा प्रशासनाने सांगितली नाही.
हेही वाचा -त्रिशूळ पर्वतावर हिमस्खलन: नौदलाचे पाच जवान बेपत्ता, रेस्क्यू सुरू