रंगपारा ( आसाम ) : शेजारच्या अरुणाचल प्रदेशातून वेगाने वाहणाऱ्या गवरू नदीच्या पुरामुळे सोनितपूरमध्ये मोठा पूर आला ( Massive erosion of Gabhoru River in Misamari ) आहे. मिसामरी येथील बांगलगाव आणि थेराजुली गावातील अनेक लोकांच्या जमिनी या नदीने आधीच वाहून गेल्या आहेत. नदीने नुकत्याच पाच कुटुंबांच्या जमिनी वाहून गेल्या.
त्याभागातील 1000 पेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे. गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळालेले निवासस्थानही नदीत वाहून गेले, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. स्वतःची काँक्रीटची घरे पडल्याने परिसरातील रहिवाशांना सुरक्षिततेसाठी पलायन करावे लागले आहे. नदीतील धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नसल्याने, ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप करण्यात येत आहे.