महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खासदाराने गळा पकडल्याने श्वास कोंडला होता... मार्शलने संसदेच्या सुरक्षा संचालकांना लिहिले पत्र - राज्यसभा गोंधळ

राज्यसभेत विरोधी पक्षांचे सदस्य वेलमध्ये गोंधळ घालत असताना मार्शल राकेश नेगी यांना बोलाविण्यात आले होते. खासदार इलामरन करीम आणि खासदार अनिल देसाई यांनी सुरक्षा तोडून राज्यसभेच्या चेअरकडे जाण्याचा प्रयत्न केल्याचे मार्शलने पत्रात म्हटले आहे.

राज्यसभा
राज्यसभा

By

Published : Aug 12, 2021, 10:36 PM IST

नवी दिल्ली- राज्यसभेच्या गोंधळानंतर केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये वादविवाद सुरू झाले आहेत. राज्यसभेच्या गोंधळाबाबत पुरुष मार्शलने सुरक्षा सेवेच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात खासदार इलामरन करीम, अनिल देसाई आणि इतरांची नावे लिहिली आहेत.

राज्यसभेत विरोधी पक्षांचे सदस्य वेलमध्ये गोंधळ घालत असताना मार्शल राकेश नेगी यांना बोलाविण्यात आले होते. खासदार इलामरन करीम आणि खासदार अनिल देसाई यांनी सुरक्षा तोडून राज्यसभेच्या चेअरकडे जाण्याचा प्रयत्न केल्याचे मार्शलने पत्रात म्हटले आहे. एलामरन करीम यांनी माझा गळा पकडला. त्यामुळे माझा श्वास कोंडला आणि गुदरमल्याचे राकेश नेगी यांनी संसदेच्या सुरक्षा सेवेच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा-राज्यसभेत महिला खासदारांबरोबरील गैरवर्तवणुकीचा आरोप केंद्राने फेटाळला, जारी केला व्हिडिओ

महिला मार्शल अक्षिता भट यांनीही सुरक्षा सेवेच्या संचालकांना पत्र लिहून सभागृहातील गोंधळाची माहिती दिली आहे. त्यांनी पत्रात म्हटले, की काही खासदार हे निषधे करण्यात व्यस्त होते. ते माझ्या दिशेने धावले व त्यांना सुरक्षा व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी विरोध केला तेव्हा महिला खासदार छाया वर्मा आणि फुलो देवी नेतम हे बाजूला आले. त्यांनी पुरुष खासदारांना जाण्यासाठी आक्रमकपणे वाट करून दिली. त्यामधून सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन करण्यात आले.

हेही वाचा-पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे संसदेपासून का पळाले - डेरेक ओ ब्रायन

विरोधी पक्षाने सरकारवर केली आहे टीका-

दरम्यान, राज्यसभेत विमा विधेयक सुधारणा 2021 पारित होत असताना गोंधळ झाला होता. महिला खासदारांवर हल्ला झाल्यावरून राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी गुरुवारी शुक्रवारी टीका केली. 40हून अधिक पुरुष आणि महिला या खासदारांना नियंत्रणात आणण्याकरिता बाहेरून सभासगृहात आणण्यात आले. माझ्या 55 वर्षांच्या संसदेच्या कारकीर्दीत, राज्यसभेमध्ये महिला खासदारांवर हल्ला झाल्याचे कधीही पाहिले नाही. हे वेदनादायी आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे.

हेही वाचा-संसदेमध्ये महिला खासदारांशी गैरवर्तवणूक ही अत्यंत दुर्दैवी घटना - खासदार मनोज झा

केंद्र सरकारकडून सीसीटीव्ही फुटेज जारी-

दरम्यान, केंद्र सरकारने राज्यसभेतील गोंधळाचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. सभागृहाच्या वेलमध्ये मार्शल हे विरोधी पक्षांच्या खासदारांना राज्यसभेच्या चेअरकडे जाण्यापासून रोखत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. खासदार हे मार्शल हे धक्काबुकी करतात. तर दोन महिला खासदार हे महिला मार्शलला तयार केलेल्या मार्शल वॉलपासून बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतात. महिला खासदाराला धक्काबुकी झाल्याचा विरोधी पक्षांनी आरोप केल्यानंतर केंद्र सरकारने राज्यसभेतील गोंधळाचा व्हिडिओ जारी केला आहे.

महिला खासदारांशी गैरवर्तवणूक ही अत्यंत दुर्दैवी घटना-

विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपत्ती एम. व्यकंय्या नायडू यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार झा म्हणाले, की संसदेमध्ये देशाची प्रतिष्ठा आहे. जर संसदेमध्ये अशीच स्थिती राहिली तर प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महिला खासदारांशी गैरवर्तवणूक ही अत्यंत दुर्दैवी घटना होती.

ABOUT THE AUTHOR

...view details