इंदूर - आपल्या पतीने मित्र आणि घरातील कामगारासोबत पत्नीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना इंदूर येथे समोर आली ( Gang Rape In Indore ) आहे. पिडीतेने याबाबत पतीसह अन्य साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पिडीतेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मेट्रीमोनियल संकेतस्थळावरून (Marriage On Matrimonial Site In Indore) या पिडीतेची राजेश विश्वकर्मा याच्या सोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. मात्र, राजेशने त्याचे पहिले लग्न केल्याचे यावेळी लपवून ठेवले होते. लग्नानंतर राजेश एबी रोड मांगलिया येथील त्याच्या फार्महाऊसवर या पिडीतेला घेऊन गेला.