महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IPL 2022 Updates : आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का; मार्क वूड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर - आयपीएलच्या ताज्या बातम्या

इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) सुरू होण्यासाठी अवघा थोडाच अवधी शिल्लक आहे. त्या आधीच लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का बसला ( Big blow to Lucknow Super Giants ) आहे. लखनऊने आपला वेगवान गोलंदाज मार्क वुड गमावला आहे. मार्क वुड दुखापतीमुळे आयपीएल 2022 मध्ये खेळू शकणार नाही.

Mark Wood
Mark Wood

By

Published : Mar 18, 2022, 6:54 PM IST

अँटिग्वा:आयपीएल 2022 चा हंगाम 26 मार्चपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला फक्त 8 दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच या स्पर्धेसाठी यंदा 10 संघांनी कंबर कसली आहे. परंतु आयपीएल 2022 च्या हंगामात सहभागी झालेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला स्पर्धा सुरु होण्यागोदर मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज ( Mark wood Ruled Out of IPL ) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे की, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड कोपराच्या दुखापतीमुळे आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामातून बाहेर पडला आहे.

मार्क वूड सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघासोबत आहे.अँटिग्वामधील पहिल्या कसोटीत त्याच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली ( Injury to Mark Wood ) आहे. त्यामुळे तो बार्बाडोसमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएल मेगा लिलावात वुडला लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाने 7.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, एक मेडिकल अपडेटमध्ये ईसीबीने लखनऊ सुपरजायंट्सला ( Lucknow Super Giants ) माहिती दिली आहे. सध्या वूडला गोलंदाजी मधून बाहेर करण्यात आले आहे. फ्रँचायझीने त्याच्या जागी आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला घेतलेली नाही. मात्र, त्याला वगळण्यात आल्यानंतर वुडचा आयपीएलमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ईसीबीने वुडच्या दुखापतीचा तपशीलवार आढावा देणे अपेक्षित आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वुडला दुखापत झाली होती.

तो मैदान सोडण्या अगोदर फक्त पहिल्या ड्रा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फक्त पाच षटके गोलंदाजी करु शकला होता. पाचव्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी नेटमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना, त्याला 'तीव्र वेदना' झाल्याने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही.

या आधी, आयपीएल मेगा लिलावात सुपर जायंट्सने निवड केल्यानंतर काही दिवसांनी, वुडने द गार्डियनला सांगितले की, ''सुपर जायंट्सने माझी निवड केल्यानंतर माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला''. 2018 मधील पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) कडून खेळल्यानंतर वुडचा सुपर जायंट्ससह आयपीएलमधील दुसरा हंगाम असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details