मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाउचरची आगामी इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) हंगामासाठी मुंबई इंडियन्स ( MI ) च्या प्रशिक्षकपदी नियुक्ती ( Mark Boucher appointed coach of Mumbai Indians ) करण्यात आली आहे. फ्रँचायझीने शुक्रवारी ही घोषणा केली. मार्क बाउचरदेखील ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी उत्साही आहे. मार्क बाउचरची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर मार्क बाउचर आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
45 वर्षीय माजी क्रिकेटपटू श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने ( Former Sri Lanka captain Mahela Jayawardene ) यांची जागा घेईल. ज्याची फ्रँचायझीने नुकतीच जागतिक प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. बाउचर हे दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आगामी टी-20 विश्वचषकानंतर पद सोडणार असल्याचे त्याने या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते.
बाउचर यांनी जारी केलेल्या प्रकाशनात म्हटले ( Mark Boucher Statement ) आहे की, “मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. मुंबई इंडियन्सचा इतिहास आणि कामगिरी त्यांना क्रीडा जगतातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी बनवते. या आव्हानासाठी मी तयार आहे.'' जगातील सर्वात यशस्वी यष्टीरक्षकांपैकी एक असलेल्या बाउचरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे.