महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'या' गावात उंची ठरतेय मुलांसाठी वरदान तर मुलींसाठी शाप

भारतात लग्न असो की नोकरी कमी उंचीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, बिहारच्या बेतिया जिल्ह्यात एक असे गाव आहे ज्या ठिकाणी मुलींची जास्त उंची लग्नात विघ्न निर्माण करत ( Height of Girls became Hindrance in their Marriage ) आहे. पाहा विशेष वृत्तांत...

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Apr 6, 2022, 10:58 PM IST

पाटना (बिहार) -बेतिया जिल्ह्याच्या मरहिया गावातील नागरिकांची उंची सहा फुटापेक्षा जास्त आहे. ही जास्त उंची या गावातील मुलांसाठी वरदान ठरत असून मुलींसाठी शाप ठरत आहे. उंची जास्त असल्यामुळे येथील मुलींना लग्नासाठी साजेसे वर मिळत नाहीत. यामुळे या गावातील मुलींच्या लग्नासाठी उंचीच विघ्न ठरली आहे. (Marhiya village of Bettiah) तर मुलांना उंची जास्त असल्यामुळे सैन्य भरतीत याचा फायदा होत आहे.

'या' गावात उंची ठरतेय मुलांसाठी वरदान तर मुलींसाठी शाप

जास्त उंचीचे फायदे -मरहिया गावातील नागरिकांची उंची (Height of people of Marhiya village) 6 फुटपेक्षा जास्त आहे. या गावातील अनेकांची उंची 6 फुट 3 इंच ते 6 फुट 9 इंच इतकी आहे. उंची जास्त असल्यामुळे या गावातील अनेकजण सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करु इच्छित आहेत.

जास्त उंचीचे नुकसान -या गावातील मुलीेची उंचीही जास्त आहे. यामुळे त्यांचे नुकसान होत असून जास्त उंची असल्यामुळे अनेक मुलांकडून लग्नासाठी नकार येतो. त्यामुळे त्यांना आपल्यापेक्षा जास्त उंचीचा मुलगा शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहे.

या गावातील तब्बल 120 तरुण सैन्य भरतीच्या सरावासाठी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मैदानात धावतात. मरहिया गावात 250 घरांमध्ये सुमारे 1400 पेक्षा अधिकची जनसंख्या आहे. 650 हून अधिक राजपूत परिवारचे लोक राहतात. ते मुळचे बिहारच्या सिवान हलुआर पिपरा गावाच्या कौशिक वंशीय राजपूत आहेत. मागील पाच पिढ्यांपासून ते पश्चिम चंपारणच्या मरहिया गावात राहतात.

मरहिया गावाचा इतिहास -बेतियाचे महाराज हरेंद्र किशोर सिंह यांची पालखी जात होती त्यावेळी अचानक एका हत्तीने हल्ला चढवला. तेव्हा तलवारबाज ध्रुव नारायण सिंह हे त्याच रस्त्याने जात होते. त्यांनी तलवारने हत्तीची सोंड कापली, त्यामुळे हत्ती जखमी झाला व मरण पावला. यामुळे राजाचे प्राण वाचले. महाराजा हरेंद्र किशोर सिंह यांनी ध्रुव नारायण यांच्या बहादुरीची प्रशंसा करत मरहिया गावातील सुमारे तेवीस एकर जमीन देऊन त्यांचा सन्मान केला व या ठिकाणी राहण्यासही सांगितले. तेव्हापासून हे राजपूत या गावात राहतात. एका कुटुंबाचे आतापर्यंत शंभर घरे झाली असून 700 पेक्षा जास्त यांची संख्या झाली आहे.

क्या कहता है NIN का रिसर्च -इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR ) यांची शाखा असलेल्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन ( NIN )चे कार्यालय हैदराबाद येथे आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील महिलांची उंची सुमारे 5 फुट 3 इंच तर पुरूषांची उंची 5 फुट 8 इंच इतकी आहे.

अफ्रितही आहेत अशी लोकं- अफ्रिकेच्या तंजानिया येथे राहणाऱ्या मसाई जमातीतील लोकांची उंची (Height of Masai Tribe People) सहा फुटपेक्षा जास्त असते. त्या ठिकाणी पुरुषांची व महिलांची उंची 6 फुट किंवा त्यापेक्षा जास्त आहे. जास्त उंची असल्याने जंगली प्राण्यांची शिकार करणे सोपे जाते. मसाई जमातीचे लोक अपल्या राहणीमानामुळे संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय आहे. मसाई जमातीत सेवानिवृत्त झालेले पुरूष मसाई समूहाबाबत निर्णय घेतात.

हेही वाचा -Swami Prakhar Maharaj Case: संत प्रखर महाराज लैंगिक शोषण प्रकरण: बचाव करत पीडित शिष्येचे कुटुंबावरच आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details