नवी दिल्ली -भारतामध्ये गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत अत्यंत कमी रुग्णांची (Decrease in corona patients) नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ३.३७ लाख नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patients in India) नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा २.७ टक्के कमी आहे. दैनंदिन मृत्यूची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनामुळे शुक्रवारी 703 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर आज देशात 488 मृत्यू झाले आहेत.
रोजचा पॉझिटीव्हीटी रेट देखील 17.94 टक्क्यांवरून 17.22 टक्क्यांवर खाली आला आहे. आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट 16.65 टक्के आहे. भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 21,13,365 आहे. 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन प्रकरणे आढळून आल्याने ओमायक्रॉन संसर्गाची संख्या 10,000 च्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशभरात 160 हून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. ज्यात 94 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे तर 72 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहेत.