हैदराबाद :2023 सालची शेवटची अमावस्या अतिशय विशेष मानली जाते. यंदा ही अमावस्या आज मंगळवार, १२ डिसेंबर रोजी आहे. असं मानलं जातं की, अमावस्या तिथी हा संतप्त पितरांना शांत करण्याचा शुभ दिवस आहे. भौमवती अमावस्येच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्यानं जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय अमावस्या तिथीला दान करण्याची परंपरा आहे. असे केल्यानं पितर सुखी होतात, ज्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो.
भौमवती अमावस्या 2023 तिथी मुहूर्त :
- मार्गशीर्ष कृष्ण अमावस्या तिथीचा प्रारंभ: 12 डिसेंबर, मंगळवार, सकाळी 06:24 पासून
- मार्गशीर्ष कृष्ण अमावस्या तिथीची समाप्ती: 13 डिसेंबर, बुधवार, सकाळी 05:01 वाजता
- स्नान, दान आणि तर्पण यासाठी शुभ मुहूर्त :भाऊमवती अमावस्येच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त 05:14 ते 06:43 पर्यंत आहे. यानंतर तर्पणचा शुभ मुहूर्त 11:54 ते 12:35 पर्यंत असेल.
- भौमवती अमावस्या 2023 चे महत्व :अमावस्या तिथीचा दिवस प्रार्थना आणि ऋणमुक्तीसाठी विशेष मानला जातो. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून, दान आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात, असा समज आहे. शास्त्रानुसार मंगळवारच्या अमावास्येचे व्रत केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते.