महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Margadarsi Chit Fund : 'सीआयडी जाणीवपूर्वक आमच्या ग्राहकांना त्रास देत आहे', मार्गदर्शी चिट फंडचा आरोप - मार्गदर्शी चिट फंडने सीआयडीला फटकारले

मार्गदर्शी चिट फंडने आपल्या ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, कंपनीने कोणत्याही आयकर तरतुदींचे उल्लंघन केले नाही. 'आमची आर्थिक शिस्त ही आमची ताकद आहे. आम्ही कोणत्याच नियमांचे उल्लंघन करण्याची वेळ येऊ देत नाही', असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Margadarsi Chit Fund
मार्गदर्शी चिट फंड

By

Published : Jul 11, 2023, 10:24 PM IST

हैदराबाद : मार्गदर्शी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेडने मंगळवारी सांगितले की, त्यांनी कोणत्याही आयकर तरतुदींचे उल्लंघन केलेले नाही. तसेच ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्व व्यवसाय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याचे म्हटले आहे. कंपनीने त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांच्या सदस्यांचेही आभार मानले आहे.

आंध्र प्रदेश सीआयडीची निंदा : कंपनीने आंध्र प्रदेश क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटची निंदा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या ग्राहकांना पूर्णपणे खोट्या दाव्यांवर आधारीत नोटीस पाठवून त्रास दिला. 'कंपनी चिटफंड व्यवसायासाठी निर्धारित केलेल्या नियामक चौकटीत राहून आपला व्यवसाय करत आहे. आमची आर्थिक शिस्त ही आमची ताकद आहे. आम्ही कोणत्याच नियमांचे उल्लंघन करण्याची वेळ येऊ देत नाही', असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

चिटफंड कंपनीचा आरोप : आंध्र प्रदेश सीआयडी मार्गदर्शी चिटफंडचा व्यवसाय आणि त्यांच्या ग्राहक नेटवर्कचे नुकसान करण्याच्या हेतूने त्यांची चौकशी करत असल्याचा आरोप मार्गदर्शीने केला आहे. चिटफंड कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिटफंडचे सदस्य म्हणून पुष्टी झाल्यानंतरही आमच्या सर्व सदस्यांना त्यांच्या वैयक्तिक तपशीलांबाबत आग्रह धरून दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी सीआयडी चौकशी सुरू ठेवत आहे. विशेषत: आंध्र प्रदेश सीआयडीच्या बाबतीत, जे कंपनीतील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करत आहे. तसेच चिट फंडाच्या निवडक सदस्यांना नवीन नोटीस पाठवत आहे.

आमच्या विरोधात कट - मार्गदर्शी : मार्गदर्शी चिट फंडाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, न्यायालयाच्या आदेशानंतरही, आंध्र प्रदेश सीआयडी राज्यभरातील सर्व ग्राहकांना त्रास देऊन कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी प्रेस नोट्स जारी करत आहे. यामागे निष्कलंक असलेल्या एका प्रस्थापित व्यवसायाला अस्थिर करण्याचा मोठा कट आहे. निवेदनात म्हटले आहे की, 'आंध्र प्रदेश सीआयडीने उल्लेख केलेले उल्लंघन हे पूर्णपणे कल्पित आणि खोटे होते. आम्ही पुन्हा एकदा आमच्या सदस्यांना खात्री देतो की, मार्गदर्शी कधीही अशा कोणत्याही प्रकारच्या कारनाम्यांमध्ये सामील झालेले नाही, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन झाले आहे'. मार्गदर्शीचे नियमितपणे छाननी अंतर्गत कर आकारणी केली जाते आणि सर्व योग्य गोष्टींची खात्री करून घेतली जाते. त्यामुळे उल्लंघनास फारसा वाव राहत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा :

  1. Margadarsi: मार्गदर्शीचे ऑल इंडिया चिट फंड असोसिएशनकडून समर्थन, कंपनीविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे दिले स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details