महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Marathi News Live : अभिनेता पुनीत इस्सारचे ईमेल खाते हॅक, एकाला अटक - भारतातील बातम्या

Marathi Breaking News Live Updates Today
मराठी बातम्या लाईव्ह अपडेट्स

By

Published : Nov 26, 2022, 6:40 AM IST

Updated : Nov 26, 2022, 10:45 PM IST

22:44 November 26

अभिनेता पुनीत इस्सारचे ईमेल खाते हॅक, एकाला अटक

अभिनेता पुनीत इस्सारचे ईमेल खाते हॅक करून १३.७६ लाख रुपयांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

21:15 November 26

धक्कादायक! २५ वर्षीय तरुणाच्या पार्श्वभागात लाटणे घुसवून केले जखमी

धक्कादायक! २५ वर्षीय तरुणाच्या पार्श्वभागात लाटणे घुसवून केले जखमी

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, एक आरोपी अटक दोन फरार

20:32 November 26

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाईसाठी कर्नाटक तयार - मुख्यमंत्री बोम्मई

कर्नाटकसोबतच्या सीमावादाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याने दाखल केलेल्या याचिकेत कोणतीही कायदेशीर तरतूद नव्हती. सर्वोच्च न्यायालयात प्रभावी कायदेशीर लढाईसाठी कर्नाटक पूर्णपणे तयार आहे: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

18:59 November 26

मुंबईत आज कोरोनाचे १५ नवे रुग्ण, शून्य मृत्यू

मुंबई - गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला आहे. आज १५ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या अडीच वर्षात १७५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ९४ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

18:59 November 26

महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा ठप्प, सीमेपर्यंत दोन्ही राज्याच्या बसेस लागल्या धावू.. प्रवाशांची गैरसोय

सांगली - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमईया यांच्या विधानानंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण होऊन कर्नाटकच्या बसेसवर निशाणा साधण्यात आला, परीणामी आता महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद झाली आहे,सांगली आगारातून जाणाऱ्या एसटी बस महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत आणि कर्नाटकच्या बसेसची कर्नाटकच्या सीमेपर्यंत धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना पायपीट करण्याची वेळ आली आहे.

17:24 November 26

साताऱ्यात कर्नाटकच्या बसवर भगव्या रंगाने लिहिले 'जय महाराष्ट्र'

सातारा -सीमा भागातील जत, सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला आहे. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. साताऱ्यातील शिवसैनिकांनी शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या कर्नाटकच्या बसेसवर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र लिहून आंदोलन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दात धिक्कार केला.

16:26 November 26

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन

14:37 November 26

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन

13:24 November 26

शिंदे गटाचे आमदार, खासदार गुवाहाटीत दाखल

शिंदे गटाचे आमदार, खासदार गुवाहाटीत दाखल

12:46 November 26

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात काळी पावडर फेकली

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात काळी पावडर फेकली

12:40 November 26

महाराष्ट्रातील कन्नडिगांना संरक्षण: गृह सचिवांना केले पाचारण

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद | कर्नाटकच्या गृहविभागाचे सचिव रजनीश गोयल यांनी महाराष्ट्रातील कन्नडिगांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या सचिवांना पाचारण केले. या वादावर काल महाराष्ट्रात निदर्शने पाहायला मिळाली.

12:32 November 26

मनीष सिसोदियांच्या विरोधात पुरावे नाहीत.. केजरीवालांचा दावा

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरण |मनीष सिसोदिया यांना क्लीन चिट मिळाली आहे. सीबीआय-ईडीचे सुमारे 800 अधिकारी गेल्या 4 महिन्यांपासून त्यावर काम करत होते. त्यांना एकच काम देण्यात आले- काहीही करा, मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाका. आजच्या आरोपपत्रात त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे दिसून येतेः दिल्लीचे मुख्यमंत्री

09:13 November 26

मुंबई: २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण, मुख्यमंत्री, राज्यपालांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : 14 वर्षांपूर्वी या दिवशी महानगरावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या शहीदांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुष्पहार अर्पण केला. त्यांनी दक्षिण मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मारकावर श्रद्धांजली वाहिली, जिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी अधिकारी उपस्थित होते. नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनीही शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

07:29 November 26

दहशतवादामुळे मानवतेला धोका: परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर

दहशतवादामुळे मानवतेला धोका आहे. आज, 26/11 रोजी, जग आपल्या पीडितांच्या स्मरणात भारतामध्ये सामील झाले आहे. ज्यांनी या हल्ल्याची योजना आखली आणि त्यावर देखरेख केली त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आम्ही जगभरातील दहशतवादाच्या प्रत्येक बळीचे ऋणी आहोत: EAM डॉ एस जयशंकर

07:14 November 26

सरकारी नोकऱ्यांसाठी तृतीयपंथीयांना जनरल कोट्यातून करता येणार अर्ज

कोलकाता:पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांना सामान्य श्रेणीतील सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडले जाईल, असे ते म्हणाले.

07:08 November 26

ब्राझीलच्या शाळांमध्ये गोळीबार.. तीन ठार, आठ जखमी

ब्राझीलच्या एस्पिरिटो सॅंटो राज्यातील दोन शाळांमध्ये शूटरने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार आणि किमान आठ जखमी झाले, अशी माहिती स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिली आहे.

06:57 November 26

महाविकास आघाडीतप्रकाश आंबेडकरांना दार उघडे ?

मुंबई :उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांकडून नव्या युतीच्या नांदीबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही समावेश होणार का ? या चर्चांना उधाण आलंय. मात्र अद्याप तरी वंचित बहुजन आघाडी बाबत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही चर्चा केली नाही. मात्र जर महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीला यायचा प्रस्ताव असेल तर त्याचं काँग्रेस कडून स्वागत करण्यात आल आहे.

06:31 November 26

यशवंतराव चव्हाण सेंटरचा राज्यस्तरीय पारितोषिक साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना प्रदान

मुंबई -आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना शरद पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे देखील उपस्थित होते.

06:27 November 26

Breaking News Live : शिंदे गटाचे आमदार, खासदार गुवाहाटीत दाखल

आज दिवसभरात घडणाऱ्या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Last Updated : Nov 26, 2022, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details