नवी दिल्ली :देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, सध्या दिवसेंदिवस अधिकाधिक रुग्ण आढळून येत आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयामध्येही कित्येक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्या काही काळाने पुढे ढकलल्या आहेत. १०.३०ला ज्या खंडपीठांमध्ये सुनावणी पार पडणार होती, त्याठिकाणी आता ११.३०ला सुनावणी पार पडेल. तसेच ११ वाजता सुरू होणाऱ्या सुनावण्या, १२ वाजता सुरू होतील.