महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Road Accident in Poonch : पूंछ भागात कार कोसळली दरीत; भीषण अपघातात 9 जण ठार - accident latest news

सारनकोटच्या तारारावली बुफलियाज पूंछ भागात टाटा सुमोला झालेल्या अपघातात नऊ जण जागीच ठार ( Road Accident in Poonch ) झाले, तर चार जण जखमी झाले. जखमींना सरनकोट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Road Accident in Poonch
पूंछ भागात कार कोसळली दरीत

By

Published : Apr 1, 2022, 12:15 PM IST

पूंछ (जम्मू कश्मीर) - सारनकोटच्या तारारावली बुफलियाज पूंछ भागात टाटा सुमोला झालेल्या अपघातात नऊ जण जागीच ठार ( Road Accident in Poonch ) झाले, तर चार जण जखमी झाले. जखमींना सरनकोट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पूंछ भागात कार कोसळली दरीत

मिळालेल्या माहितीनुसार, सारनकोटच्या तारारावली बुफलियाज भागात टाटा सुमोला झालेल्या अपघातात नऊ जण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. जखमींना सरनकोट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पूंछ भागात कार कोसळली दरीत

पोलिसांनी सांगितले की, कार मुर्राह गावामधून येत होती आणि ते सुरनकोटच्या दिशेने जात होती. चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा अपघात घडला. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस आणि लष्कराने तातडीने बचावकार्य करण्यात आले आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णालयात नेत असताना तिघांचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पुंछमध्ये झालेल्या एका भीषण रस्ता अपघातामध्ये झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे. जखमींवर शक्य ते सर्व उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

हेही वाचा -LPG price hiked : महागाईच्या झळा! एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 250 रुपयांची वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details