मुरादाबाद -उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात नानपूर येथे ट्रक आणि मिनी बसची जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 25 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तर प्रदेशात ट्रक व बसच्या अपघातात दहा जणांचा मृत्यू - उत्तर प्रदेश अपघात बातमी
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात नानपूर येथे ट्रक आणि मिनी बसची जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
सात जणांचा जागीच मृत्यू
कुंदरकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताच्या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
Last Updated : Jan 30, 2021, 11:11 AM IST