आग्रा - ट्रक आणि स्कॉर्पियोची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 3जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. स्कॉर्पियोमध्ये एकूण 12 जण होते. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच जखमींना रुग्णालयात पाठवले आहे.
ट्रक आणि स्कॉर्पियोची जोरदार धडक; 9 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी - आग्रामध्ये अपघातात आठ जणांचा मृत्यू
ट्रक आणि स्कॉर्पियोची जोरदार धडक झाल्याने 9 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
आग्रा अपघात
दिल्ली-कानपुर मार्गावर हा अपघात झाला. दोन्ही गाड्या वेगवेगळ्या दिशेने जात होत्या. मात्र, स्कॉर्पियोवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ट्रकला जाऊन धडकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्कॉर्पियोमधील प्रवासी हे झारखंडचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Last Updated : Mar 11, 2021, 9:32 AM IST