खंडेला (राजस्थान) : राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खंडेला परिसरात रविवारी भीषण अपघात झाला. (accident in Sikar Rajasthan). खंडेला-पलसाणा रस्त्यावर माळीसाहेबांच्या ढाण्याजवळ पिकअपने प्रथम दुचाकीला धडक मारली. त्यानंतर त्याने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. (pickup truck accident in Sikar Rajasthan). या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. (pickup truck accident)
पोलिसांचा तपास सुरु : खंडेला पोलिस स्टेशनचे एसएचओ सोहनलाल यांनी सांगितले की, दोन मृतांचे मृतदेह खंडेला हॉस्पिटलच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत. तर 6 जणांचे मृतदेह पलसाणा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या घटनेत जखमी झालेल्यांना पलसाणा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे. अपघातातील मृतक हे सामोद परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व पिकअपने खंडेला येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते. पोलीस मृतांची ओळख पटवण्यात गुंतले आहेत.