ट्रक आणि पिकअपच्या भीषण अपघातात 6 महिला ठार रायपूर : ट्रक आणि पिकअपच्या भीषण धडकेत तब्बल सहा जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना छत्तीसगडमधील बलौदाबाजार जिल्ह्यातील पलारीजवळ रविवारी रात्री घडली आहे. या अपघातात 10 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांमध्ये महिलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघातातील दोन गंभीर नागरिकांना रायपूरला हलवण्यात आले आहे. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बालकाच्या अन्न प्राशन कार्यक्रमावरुन येत होते नागरिक :लटवा गावातील नागरिक कानकी या खरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावात नागरिक बालकाच्या अन्न प्राशन कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी कार्यक्रम आटोपून रविवारी रात्री सगळे नागरिक पिकअपमधून लटवा गावाकडे परत येत होते. पिकअप पलारीच्या गोंडा पुलिया गावाजवळ आल्यानंतर भरधाव ट्रकने या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यामुळे पिकअपमधील तब्बल सहा महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमीतील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रायपूरला हलवण्यात आले आहे.
पिकअपमध्ये 15 पेक्षा जास्त नागरिक :लटवा या गावातील नागरिक अन्न प्राशन कार्यक्रमाला पिकअपमधून कानकीला गेले होते. यावेळी पिकअपमध्ये तब्बल 15 पेक्षा जास्त नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ट्रकने पिकअपला चिरडल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेसह पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पलारी पोलीस ठाण्यातील पोलीस जवानांनी घटनास्थळावर मदत करुन या जखमी नागरिकांना पलारी रुग्णालयात दाखल करुन बचावकार्य केले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली, तर एका तरुणीचा मृत्यू पलारी आरोग्य केंद्रात झाला.
अपघातानंतर ट्रकचालक झाला पसार :पिकअपला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला. पोलीस या फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. या अपघातातील गंभीर जखमींना बलौदाबाजार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रायपूरला हलवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Himachal Accident News: कंटेनर 150 मीटर खड्ड्यात कोसळला, एकाच कुटुंबातील तीन जणांसह 6 जणांचा मृत्यू
- Bihar Crime : बिहारमध्ये प्रयागराजसारखी घटना, तरुणांनी पाठलाग करून पंचायत प्रमुखाच्या पतीला घातल्या गोळ्या
- Villupuram Toxic Liquor : विषारी दारू पिल्यामुळे तामिळनाडूत दहा नागरिकांचा बळी, तीन महिलांचाही समावेश