लखनऊ (उत्तरप्रदेश) -राज्यात जोरदार पाऊस झाला. यादरम्यान विविध ठिकाणी वीज कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यात कानपूरमधील 18, प्रयागराज - 13, प्रतापगड - 1, आगरा - 3 आणि वाराणसी व रायबरेलीतीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तसेच 30 पेक्षाजास्त जण जखमी आहेत.
सर्वात जास्त नुकसान कानपूरमध्ये -
वीज कोसळल्याने सर्वात जास्त नुकसान कानपूरमध्ये झाले आहे. कानपूरच्या भोगनीपुर तालुक्यातील वेगवेगळ्या गावात पाच, घाटमपूरमध्ये एक, फतेहपुर जिल्ह्यात सात आणि हमीरपूरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर बांदा कोतवाली क्षेत्राच्या मोतियारी गावात 13 वर्षीय मुलगी आणि उन्नावच्या सराय बैदरा गावात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 38 जनावरांचादेखील मृत्यू झाला आहे.
प्रयागराजमध्ये झालेल्या मुसळधार पावसादरम्यान विविध ठिकाणी वीज कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत. जखमींचा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रयागराजच्या कोरांव ठाणे परिसरात तीन, बारा मे तीन आणि करछनामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर गंगापारच्या सोरांव तालुक्यात विविध ठिकाणी पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये एक बालक, दोन तरुण, तीन तरुणी आणि तीन महिला तसेच वृद्धांचा समावेश आहे.
कौशांबीच्या चायल आणि मंझनपुर तालुक्यात दोन-दोन जणांचा मृत्यू धाला आहे. यात पुरखासमध्य रामचंद्र, अकबराबाद गुसैलीमध्ये मूरतध्वज, पश्चिम शरीरामध्ये मयंक उर्फ शनि यांचा समावेश आहे. तर प्रतापगढ़च्या मंगापुरमध्ये आशाराम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आगराच्या शिकोहाबाद क्षेत्रातील दोन गावांत तीन शेतकरी हेमराज, रामसेवक उर्फ भूरी सिंह आणि अमर सिंह यांचा मृत्यू झाला आहे. रायबरेली जिल्ह्याच्या सिरसिरा गावात आशाराम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर वाराणसी जिल्ह्यात रिक्शा खुर्द गावात गाय चारायला गेलेल्या 15 वर्षीय विकल नावाच्या मुलाच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाद, कौशाम्बी, कानपुर नगर, कानपुरमध्ये आकाशातील वीज कोसळून मृत्यू झालेल्यांच्या प्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना नियमावलीनुसार तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच जखमी झालेल्यांवर योग्य ते उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.