महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Agra Houses Collapse : आग्रामध्ये खोदकामामुळे कोसळली 24 घरे ; एका मुलीचा मृत्यु - खोदकामामुळे घरे कोसळल्याची माहिती

आग्रा सिटी स्टेशन रोडवर असलेल्या धर्मशाला येथे गुरुवारी भीषण अपघात झाला. धर्मशाळेत सुरू असलेल्या खोदकामामुळे अनेक घरांची अचानक पडझड झाली. घरात उपस्थित असलेले अनेक लोक घराखाली गाडले गेले आहेत. यामध्ये एका मुलीचा मृत्यु झाला आहे, बचावकार्य अद्याप सुरू आहे.

Agra Houses Collapse
आग्रामध्ये खोदकामामुळे कोसळली 24 घरे

By

Published : Jan 26, 2023, 10:46 AM IST

Updated : Jan 26, 2023, 2:20 PM IST

आग्र्यामध्ये खोदकामामुळे कोसळली घरे

आग्रा:ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम स्थानिक लोक स्वतः करत आहेत. अनेक वेळा फोन करूनही रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले नाही. धुलियागंज येथील सिटी स्टेशनच्या बाहेर गुरुवारी सुमारे 20 ते 25 घरे कोसळली आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मुलीला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या ढिगाऱ्यात अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खोदकाम सुरू असल्यामुळे घरे कोसळली:माहिती मिळताच प्रादेशिक पोलीस ठाणे कोतवाली, हरिपर्वत पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मशाळेच्या तळघरात खोदकाम सुरू होते, त्यामुळे घरे कोसळली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जण गाडले गेल्याचे आढळून आले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे. खोदकामामुळे घरे कोसळल्याची माहिती मिळत आहे.

वरळीतील घटना:वरळीत 9 जानेवारीलाअविघ्न टॉवर या इमारतीची लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. दोन्ही कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली होती. ही इमारत 19 मजली उंच असून काच साफ करताना दोन कामगार लिफ्टसह 16व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात आणण्यापूर्वी या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती नायर रुग्णालयाने दिली होती.

16व्या मजल्यावरून पडून मृत्यू: वरळीतील अविघ्न हाऊस मायानगर येशील इमारतीत हा अपघात झाला होता. ही इमारत 19 मजली उंच असून काच साफ करताना दोन कामगार लिफ्टसह 16व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. वरळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून माहितीनुसार, या १९ मजली इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्याचे काम सुरू होते. लिफ्ट बसवताना हा अपघात झाला होता. लिफ्टमध्ये आणखी लोकइमारतीच्या २३व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली होती. या इमारतीच्या बांधकामाधीन लिफ्टमध्ये दोन कामगार लिफ्टच्या ट्रॉलीच्या साहाय्याने काच साफ करत असताना लिफ्ट कोसळली होती. या लिफ्ट ट्रॉलीमध्ये काम करणारे दोघेजण लिफ्टसह सोळाव्या मजल्यावरून जमिनीवर पडले होते. गंभीर अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : Building Collapsed In UP: लखनौत भूकंपाच्या धक्क्याने इमारत कोसळली

Last Updated : Jan 26, 2023, 2:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details