जयपूर - राजस्थास सरकारचा लवकरच मंत्रिमंडळविस्तार होणार असल्याची चर्चा आहे. याची औपचारिक घोषणा झाली नसली, तरी मुख्यमंत्री अशोक गहलोत कोणत्या नव्या चेहऱ्यांना आपल्या मंत्रिमंडळात सहभागी करून घेतात आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच सचिन पायलट यांच्या विश्वासातील किती जणांना गहलोत यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळते, याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. यावेळी कामगिरीच्या आधारावर मंत्र्यांनी नियुक्ती होणार आहे. त्यासोबतच काँग्रेस पक्ष कामराज फॉर्म्यूला राजस्थानमध्ये लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार मजबूत मंत्र्यांना पक्षातील संघटनेचीदेखील जबाबदारी देण्यात येणार आहे.
'या' मंत्र्यांची पक्षसंघटनेसाठी होऊ शकते नियुक्ती-
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी स्वत: राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद' असा सिद्धांत आहे. मी राज्य काँग्रेसचा अध्यक्ष असल्याने नियम पाळायची पहिली जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मला शिक्षणमंत्र्याच्या जबाबदारीतून मुक्त करावे, जेणेकरून मी राजस्थान काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून योग्यरित्या काम करू शकेल, असे त्यांनी म्हटले. तर महसूलमंत्री हरीश चौधरी यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार काँग्रेस पक्ष त्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे. त्यांना एखाद्या राज्यात निवडणुकीची जबाबदारी दिली जाऊ शकते. राजस्थानचे परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास काँग्रेसमधील एक आक्रमक चेहरा आहे. त्यामुळे पक्ष त्यांचा वापर संघटनेसाठी करु शकतो. असे झाल्यास त्यांना राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ता किंवा राजस्थान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवल्या जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी कोरोनाकाळात चांगली कारगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून हटवण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ते काँग्रेसमधील एक आश्वासक चेहरा आहे. त्यामुळे त्यांना संघटनेची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्यांना एआयसीसीमध्ये महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. ममता भुपेश या राजस्थानमधील एकमेव महिला मंत्री आहेत. त्यासोबतच काँग्रेसमधील एक मोठ्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना महिला काँग्रेसची जबाबदारी मिळू शकते.
हे मंत्री आहेत विवादात -