महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Bajaj Died : राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगतात पोकळी निर्माण झाली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद - Reaction on Rahul Bajaj demice

राहुल बजाज
राहुल बजाज

By

Published : Feb 12, 2022, 4:42 PM IST

Updated : Feb 12, 2022, 10:59 PM IST

22:56 February 12

राहुल बजाज यांना कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांच्याकडून श्रद्धांजली

कृषिमंत्री दादा भुसे

राहुल बजाज यांना कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांच्याकडून श्रद्धांजली

21:06 February 12

अतिशय जवळचा मित्र गेला : अंकुश काकडे

अंकुश काकडे

राहुल बजाज यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अतिशय जवळचा मित्र गेला असे ते म्हणाले.

21:06 February 12

ऑटो उद्योग क्षेत्रातील 'बुलंद तस्वीर' गमावली - डॉ. नितीन राऊत


मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती व बजाज ऑटो उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पद्मभूषण राहुल बजाज यांच्या दुःखद निधनामुळे भारतीयांची उद्योग क्षेत्रातील अस्मिता, प्रतिभा, क्षमता आणि कल्पकता यांचे प्रतीक आपल्यातून निघून गेले आहे. 'बुलंद भारत की बुलंद तस्वीर,हमारा बजाज' या गीताप्रमाणे प्रत्येक भारतीयाला आपले वाटणाऱ्या बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग विशेषतः ऑटो उद्योग क्षेत्राने आपली 'बुलंद तस्वीर' गमावली आहे,अशी शोक संवेदना राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

गांधीवादी आजोबांच्या प्रेरणेने उद्योगासोबतच समाजसेवेचा वारसाही त्यांनी जपला. सत्तेत कुणीही असो आपला स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणा जपून त्यांनी देशवासियांसमोर विशेषत: उद्योजकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. "केंद्रात युपीए सरकार असताना आम्ही खुलेपणाने केंद्र सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करू शकत होतो. मात्र देशात सध्या भीतीचे वातावरण असून केंद्रातील सरकारवर टीका केल्यास त्याकडे सकारत्मकतेने पाहिले जाईल असे वाटत नाही," हे त्यांनी २ वर्षांपूर्वी केलेले वक्तव्य आजही देशातील स्थितीवर मार्मिक भाष्य करणारे आहे.

देश आज गंभीर आर्थिक संकटातून जात असताना उद्योग आणि आर्थिक क्षेत्राने बजाज यांचा हा आदर्श ठेवून आपले प्रश्न, अडीअडचणी निर्भिडपणे मांडणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही डॉ. राऊत म्हणाले. "बजाज स्कुटर"च्या माध्यमातून मध्यमवर्गीय लोकांचे दुचाकी घेण्याचे स्वप्न साकारणारे उद्योग क्षेत्रातील अध्वर्यू व्यक्तीमत्व देशाने गमावले, असेही ते म्हणाले. राहुल बजाज यांनी ऑटो उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम केले. तीन दशकांपूर्वी मध्यमवर्गीय लोकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी 'बजाज स्कुटर'ची निर्मिती केली. हमारा बजाज ही बजाज कंपनीची टॅग लाईन देशातील नागरिकांच्या मनात आजही घर करून आहे. बजाज उद्योग समुहाच्या दुचाकींना ग्राहकांची पहिली पसंती होती. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी काम केले. राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष या नात्याने राहुल बजाज यांनी गेली ४० वर्षे आपल्या कुटुंबीयांचा समृद्ध वारसा सांभाळला. प्रकृती अस्वास्थ्य आणि वृद्धापकाळामुळे त्यांनी गेल्यावर्षीच अध्यक्षपद सोडले होते. बजाज फायनान्स व बजाज फिनसर्व या वित्तीय कंपन्या स्थापन करून त्यांनी ग्राहकांना वाहन व गृह कर्ज उपलब्ध करून दिले.

19:12 February 12

महाराष्ट्राचा उद्योगमहर्षी हरपला - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वाहिली राहुल बजाज यांना श्रद्धांजली


राहुल बजाज यांचं आज निधन झालं याबद्दल खरोखर तीव्र दुःख आहे. त्यांना महाराष्ट्राचे उद्योगमहर्षी असंच म्हटलं पाहिजे. त्यांनी त्यांचा उद्योग विस्तार केला तो खरोखर सर्वांना अचंबित करणारा आहे. स्वर्गीय कमलनयन बजाज यांनी सुरू केलेली ही उद्योगाची गंगोत्री राहुल बजाज यांनी त्यांच्या काळामध्ये लोकांमध्ये परिवर्तन केलं.अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली आहे. मला इथे नमूद करताना इतका अभिमान वाटतो की राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगाचा जास्तीत जास्त विस्तार महाराष्ट्रातच केला म्हणजे पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये, नगर जिल्ह्यात या सर्व ठिकाणी त्यांनी त्यांच्या उद्योगाच्या शाखा उभारल्या. निर्मिती केंद्र स्थापन केली. हे करत असताना अनेकांना स्फूर्ती आणि वाव दिला. त्यांनी त्यांच्या दुचाकी आणि तीन चार कासाठी सुटे भाग निर्माण करण्यासाठी अनेक छोटे उद्योजक सूक्ष्म उद्योजक यांना संधी दिली आणि त्याच्यातून ते उभे राहिले. असेही देसाई म्हणाले

19:10 February 12

देशाचे आणि औद्योगिक क्षेत्राचे फार मोठे नुकसान : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत

उद्योगपती राहुल बजाज यांच्या जाण्याने देशाचे आणि औद्योगिक क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. दुचाकी उत्पादनात त्यांचे फार मोठे योगदान आहे,, अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली.

18:04 February 12

राहुल बजाज यांचे उद्योग क्षेत्रातील योगदान लक्षात राहील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्री राहुल बजाज जी वाणिज्य आणि उद्योग जगतात त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी स्मरणात राहतील. व्यवसायाच्या पलीकडे, त्यांना समाजसेवेची आवड होती आणि ते उत्तम संभाषणकार होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.

18:00 February 12

महाराष्ट्राने एक दूरदर्शी उद्योगपती गमावला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

बजाज समूहाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यातही आघाडीवर आहे. राहुल बजाज यांच्या निधनाने देशाने आणि विशेषतः महाराष्ट्राने एक दूरदर्शी उद्योगपती गमावला आहे, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भावना व्यक्त केल्या.

17:51 February 12

राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगतात पोकळी निर्माण झाली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद

श्री राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. भारतीय उद्योगाचे एक नायक, ते त्याच्या प्राधान्यांबद्दल उत्कट होते. त्यांची कारकीर्द देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उदय आणि जन्मजात शक्ती प्रतिबिंबित करते. त्यांच्या निधनाने उद्योगजगतात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

17:49 February 12

राहुल बजाज यांचे जाणे हे भारताचे मोठे नुकसान : राहुल गांधी

राहुल बजाज यांचे जाणे हे भारताचे मोठे नुकसान आहे. ज्याच्या धैर्याने आम्हाला अभिमान वाटला असा द्रष्टा आम्ही गमावला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

17:47 February 12

राहुल बजाज यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत दूरगामी योगदानासह मोठा वारसा सोडला : ममता बॅनर्जी

देशाचे प्रतिष्ठित उद्योगपती राहुल बजाज राहिले नाहीत याचं दुःख आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत दूरगामी योगदानासह मोठा वारसा सोडला आहे, अशी भावना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

17:45 February 12

राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले : आदित्य ठाकरे

पद्मभूषण श्री राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले. बजाज परिवाराप्रती माझ्या मनापासून संवेदना, अशी प्रतिक्रिया मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

17:41 February 12

उद्योग क्षेत्रासाठी मार्गदर्शक असलेला आणखी एक तारा निखळलाय : चंद्रकांत पाटील

'बजाज'च्या उत्पादनांनी भारतीय ग्राहकांच्या मनात अमीट ठसा उमटवला. 'हमारा बजाज' खरोखरच भारतीयांच्या अभिमानाशी जोडलेला ब्रँड होता. या ब्रँड आणि उद्यमशीलतेचे शिल्पकार राहुल बजाज यांच्या जाण्यानं उद्योग क्षेत्रासाठी मार्गदर्शक असलेला आणखी एक तारा निखळलाय, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

17:27 February 12

उद्योजक राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार : मुख्यमंत्री ठाकरे

उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. याबाबत उद्योजपती ऋषी दर्डा यांनी ट्वीट केले आहे. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. त्यांच्यावार संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

17:24 February 12

एक चांगला समाजसेवक सुद्धा आपण गमावला : देवेंद्र फडणवीस

प्रसिद्ध उद्योगपती श्री राहुल बजाज जी यांच्या निधनाने समाजासाठी प्रचंड आस्था असलेले व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. ही उद्योग जगताची तर मोठी हानी आहेच, पण एक चांगला समाजसेवक सुद्धा आपण गमावला आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

17:18 February 12

पाच दशकांहून अधिक काळ भारतीय उद्योजक जगावर राहुल बजाज यांचा प्रभाव : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण श्री राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी कळताच दु:ख झाले. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ भारतीय उद्योजक जगावर प्रभाव टाकला., अशी भावना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

17:12 February 12

बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी : उपमुख्यमंत्री अजित पवार

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

17:11 February 12

देशाच्या उद्योग क्षेत्रात राहुल बजाज यांचे योगदान महत्त्वपूर्ण : राधाकृष्ण विखे पाटील

बजाज उद्योग समूहाचे मार्गदर्शक राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत अत्यंत दुःखद आहे. देशाच्या उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती प्रदान करो हीच प्रार्थना, अशी भावना माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे.

17:09 February 12

उद्योग क्षेत्रातील राहुल बजाज यांचे कार्यकर्तृत्व प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहील : प्रवीण दरेकर

बजाज समूहाचे सर्वेसर्वा,पद्मभूषण राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. उद्योग क्षेत्रातील त्यांचे कार्यकर्तृत्व प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो

17:07 February 12

‘हमारा बजाज' काळाच्या पडद्याआड : छत्रपती उदयनराजे भोसले

बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज यांचं आज शनिवारी निधन झालं. बजाज उद्योग समूहाला नावारूपाला आणणाऱ्या बजाज ‘पद्मभूषण’ सन्मानित होते. सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘हमारा बजाज' काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. हिच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दुःख व्यक्त केले आहे.

17:02 February 12

प्रेरणादायी, दूरदर्शी, सरळ आणि महान माणूस म्हणून ते सदैव स्मरणात राहतील : शत्रुघ्न सिन्हा

बजाज समुहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. प्रेरणादायी, दूरदर्शी, सरळ आणि महान माणूस म्हणून ते सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

16:59 February 12

बजाज ब्रँड घराघरात पोहोचवण्याचे श्रेय राहुल बजाज यांना : प्रफुल पटेल

प्रख्यात उद्योगपती आणि कॉर्पोरेट भारतातील सर्वात जास्त काळ अध्यक्ष राहिलेल्या पद्मभूषण श्री राहुल बजाजजी यांच्या निधनाने दु:ख झाले. बजाज ब्रँड घराघरात पोहोचवण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

16:54 February 12

नितिन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली श्रद्धांजली

पद्मभुषण राहूल बजाज यांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे. त्यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

16:54 February 12

महाराष्ट्राच्या उद्योगजगतातील तारा निखळला - यशोमती ठाकूर

सुप्रसिद्ध उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज उद्योग समुहाचे अध्यक्ष असलेल्या राहुल बजाज यांनी गेल्या पन्नास वर्षात बजाज उद्योग समूहाला नावारूपाला आणले. त्यांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने यशाचे शिखर गाठले. राहुल बजाज यांच्या जाण्यामुळे ऑटोमोबाईल उद्योगासह उद्योग जगतातील एक तारा आणि एक संवेदनशील व्यक्ती, अतिशय स्पष्टपणे आपली मते मांडणारा विचारवंत प्रसंगी सत्तेशी दोन हात करणारा योद्धा आपण गमावला आहे.अशी प्रतिक्रिया महिला आणि बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

16:51 February 12

राहुल बजाज जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले : वर्षा गायकवाड

जागतिक ख्यातीचे प्रतिष्ठित उद्योगपती, बजाज समुहाचे अध्यक्ष एमेरिटस आणि देशभक्त राहुल बजाज जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

16:48 February 12

बजाज यांच्या निधनाने मोठे नुकसान : प्रकाश जावडेकर

राहुल बजाज यांचे जाणे खूप मोठे नुकसान आहे. त्यांनी दुचाकींमध्ये एक ब्रँड तयार केला आणि राज्यसभेत प्रभावीपणे काम केले. त्यांच्या दिवंगत आत्म्याला माझी श्रद्धांजली. ओम शांती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे.

16:45 February 12

दुचाकीच्या तंत्रज्ञानाने गरीब, मध्यमवर्गीय लोकांमध्ये परिवर्तन घडवले : शरद पवार

पद्मभूषण श्री राहुल बजाज यांच्या दुःखद निधनाबद्दल कळल्यावर मला खूप धक्का बसला आहे! प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांच्या नातवाने आपल्या दुचाकी तंत्रज्ञानाने समाजात विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

16:42 February 12

मिलिंद देवरा यांनी केले ट्विट

भारतातील सर्वात स्पष्टवक्ते उद्योगपती राहुल बजाज राहिले नाहीत ही बातमी समजणे कठीण आहे. आपल्यापैकी अनेकांना राहुल काकांची तब्येत बिघडत असल्याची माहिती होती पण त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली आहे.

16:32 February 12

नवाब मालिकांनी व्यक्त केला शोक

पुणे :दिग्गज उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते.

त्यांच्या निधनावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शोक व्यक्त केला आहे. बजाज यांच्या निधनाने दुःख झालं असून, त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना असल्याचे ते म्हणाले.

Last Updated : Feb 12, 2022, 10:59 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details