उत्तरकाशी ( उत्तराखंड): Avalanche in Uttarakhand: उत्तरकाशीच्या सीमावर्ती जिल्ह्यात द्रौपदीच्या दांडा २ Draupadi ka Danda पर्वताच्या शिखराजवळ हिमस्खलन झाले आहे. यामध्ये नेहरू पर्वतारोहण संस्थेचे Nehru Institute of Mountaineering ४० गिर्यारोहक बेपत्ता झाले Mountaineers Stuck Due to avalanche आहेत. यापैकी 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गिर्यारोहकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे हवाई दलाची मदत मागितली आहे. IAF ने बचाव आणि मदत कार्यासाठी 2 चित्ता हेलिकॉप्टर तैनात केले आहेत, इतर कोणत्याही गरजांसाठी हेलिकॉप्टरचा इतर सर्व ताफा स्टँडबायवर ठेवण्यात आला आहे. Uttarkashi avalanche
डीआयजी एसडीआरएफ रिद्धीम अग्रवाल यांनी सांगितले की, एसडीआरएफचे बचाव पथक निमच्या बेस कॅम्पवर पोहोचले आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सारसावा येथून उड्डाण केले आहे. याशिवाय सहस्त्रधारा हेलिपॅडवरून खासगी हेलिकॉप्टरनेही उड्डाण केले आहे. हवाई दलाचे हेलिकॉप्टर मोठ्या प्रमाणावर बचाव कार्यात मदत करत आहे.
त्याचवेळी, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य अमित बिश्त यांनी सांगितले की, निमच्या 40 प्रशिक्षणार्थींची टीम द्रौपदीच्या दांडा-2 साठी गेली होती. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी निम रेस्क्यू मोहीम राबवत आहे. घटनास्थळी निमसोबत दोन सॅटेलाइट फोन उपस्थित आहेत. बचावकार्यासाठी निमच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे.