अमरावती ( आंध्र प्रदेश ) - आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रेल्वे अपघात ( Andhra train accident today ) झाला आहे. उशिरा निघालेल्या कोणार्क एक्स्प्रेसची धडक बसून पाच जणांचा ( Konark express accident today ) मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, गुवाहाटीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील तांत्रिक बिघाडामुळे बटुगा गावाजवळ रेल्वे थांबविण्यात आली होते. रेल्वेचे प्रवासी हे रेल्वे रुळावर उतरले होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसने पाच जणांना ( 5 deaths in rail accident ) धडक दिली, असे ते म्हणाले. श्रीकाकुलमचे पोलीस अधीक्षक जी. आर राधिका यांनी सांगितले की, "आम्ही आतापर्यंत सहा मृतदेहांची ( train track death yesterday ) ओळख पटविली आहे.
जखमींना वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश-काही जीवितहानी झाली आहे का, याचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना मदतकार्य सुरू करण्याचे आणि जखमींना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत.