महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Siddharthnagar Road Accident : उत्तरप्रदेशातील सिध्दार्थनगरमध्ये भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू - जोगिया पोलीस स्टेशन

सिद्धार्थनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात ( Siddharthnagar Road Accident ) झाला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू ( 9 Died In Road Accident ) झाला. त्याचवेळी 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Siddharthnagar Road Accident
सिध्दार्थनगरमध्ये भीषण अपघात

By

Published : May 22, 2022, 11:59 AM IST

सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश):उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात ( Siddharthnagar Road Accident ) झाला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जोगिया पोलीस ठाण्याच्या ( Jogia Police Station ) हद्दीतील नौगढ बन्सी रस्त्यावरील काट्या गावाजवळ रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला बोलेरोने धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू ( 9 Died In Road Accident ) झाला. तर 3 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचबरोबर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक : दरम्यान, अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख : अपघातानंतर सीएम योगी यांनी मृतांच्या शोकसंतोषी कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला असून अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : 'मशीद सौदी अरेबियात जाऊन बनवा', ज्ञानवापीवरून साध्वी प्राची यांचा ओवैसींवर निशाणा..

ABOUT THE AUTHOR

...view details