महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 21, 2022, 12:43 PM IST

Updated : Dec 21, 2022, 1:54 PM IST

ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra : कोरोना नियमांचे पालन करा नाहीतर भारत जोडो पुढे ढकला, मनसुख मांडवीय यांचे राहुल गांधींना पत्र

देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ( Mansukh Mandaviya ) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेत ( Bharat Jodo Yatra ) कोरोना नियमांचे पालन करण्याचे ( Follow Covid Protocol ) आवाहन केले आहे. ( Mansukh Mandaviyas letter to Rahul Gandhi )

Mansukh Mandaviya's letter to Rahul Gandhi
मनसुख मांडवीय यांचे राहुल गांधींना पत्र

नवी दिल्ली : चीनच नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारत देखील सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित 'भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) कोरोना नियमांचे पालन करण्याचे ( Follow Covid Protocol ) आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे देखील मांडवीय ( Mansukh Mandaviya ) आपल्या पत्रात म्हटले आहे. ( Mansukh Mandaviyas letter to Rahul Gandhi )

कोरोनाच्या नियमांचे पालन करावे : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोरोनाच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री आपल्या पत्रात म्हटले की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.

निवडणुकीदरम्यान कोविडचे पालन केले का? : कोविड नियमाचे पालन करणे शक्य नसल्यास सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची दखल घेऊन भारत जोडो यात्रा राष्ट्रीय हितासाठी पुढे ढकलण्यात यावी,असे पत्रात म्हटले आहे.केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी काँग्रेसला लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना पक्षाचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, मला भाजपला विचारायचे आहे की गुजरात निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी कोविड नियमाचे पालन केले का? मला वाटते की मनसुख मांडविया यांना राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आवडत नाही, परंतु लोकांना ती आवडते. आणि लोक सामील होत आहे. लोकांचे लक्ष वळवण्यासाठी मांडविया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यात्रेचा मंगळवारी राजस्थानमध्ये शेवटचा दिवस होता आणि आज यात्रेने हरियाणात प्रवेश केला. मनसुख मांडविया आज देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेणार आहेत.

Last Updated : Dec 21, 2022, 1:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details