महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Manish Sisodia Bail Plea : ईडीकडून उत्तर नाही... मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर ५ एप्रिलला सुनावणी - मनीष सिसोदिया जामीन अर्ज

दिल्ली दारू धोरण प्रकरणातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी न्यायालयाने 5 एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. ईडीने त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 9 मार्च रोजी अटक केली होती.

Manish Sisodia
मनीष सिसोदिया

By

Published : Mar 26, 2023, 6:43 AM IST

नवी दिल्ली :दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या खटल्यात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर राऊस अव्हेन्यू कोर्टात आता ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. शनिवारी विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांच्या न्यायालयात सिसोदिया यांच्या वतीने ज्येष्ठ वकील दया कृष्णन, सिद्धार्थ अग्रवाल आणि मोहित माथूर हजर झाले. मात्र जामीन अर्जासंदर्भात ईडीने न्यायालयात उत्तर न दिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

सुनावणी पुढे का ढकलण्यात आली? : 21 मार्च रोजी मनीष सिसोदिया यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, राऊस एव्हेन्यू न्यायालयाने जामीन अर्जाबाबत ईडीला नोटीस पाठवली होती आणि उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. यासोबतच न्यायालयाने 25 मार्च ही सुनावणीची तारीख दिली होती. अशा परिस्थितीत ईडीला 25 मार्चपूर्वी उत्तर दाखल करायचे होते. शनिवारी जामीन अर्जावर दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये वादावादी होणार होती. परंतु ईडीकडून उत्तर दाखल न झाल्यामुळे हा युक्तीवाद झाला नाही आणि न्यायालयाने पुढील तारीख निश्चित केली.

सीबीआय न्यायालयाने निर्णय राखून ठेवला : यापूर्वी शुक्रवारी 24 मार्च रोजी, दारू घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आता या प्रकरणातील जामीन अर्जावर न्यायालय 31 मार्च रोजी निकाल देणार आहे. विशेष म्हणजे, दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना सीबीआय प्रकरणात 3 एप्रिलपर्यंत आणि ईडी प्रकरणात 5 एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक : उल्लेखनीय आहे की, उत्पादन शुल्क प्रकरणात चौकशीदरम्यान सीबीआयने माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सीबीआयची कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने सिसोदियांची रवानगी तिहार तुरुंगात केली होती. तेथून 9 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीदरम्यान अटक केली होती.

हेही वाचा :Tejashwi Yadav : झुकणे सोपे! मात्र, आम्ही लढण्याचा निर्णय घेतलाय; बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

ABOUT THE AUTHOR

...view details