महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Manipur Violence : मणिपूर व्हायरल व्हिडिओची होणार सीबीआय चौकशी, एफआयआर नोंदवला - मणिपूर सीबीआय चौकशी

मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

cbi
सीबीआय

By

Published : Jul 29, 2023, 4:22 PM IST

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयने 4 मे च्या रात्री तीन महिलांना विवस्त्र करणे, त्यापैकी एकीचे लैंगिक शोषण करणे आणि दोन पुरुषांची हत्या केल्या प्रकरणी तपास हाती घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मणिपूर पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा एफआयआर नोंदवला आहे.

ट्रायल मणिपूरच्या बाहेर : केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. सरकारने गुरुवारी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि सांगितले की ते 'महिलांवरील कोणत्याही गुन्ह्याबद्दल शून्य सहिष्णुता' राखतात. खटला दाखल झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत खटल्याची सुनावणी पूर्ण करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच ट्रायल मणिपूरच्या बाहेर व्हावे, असेही केंद्राने म्हटले आहे.

मणिपूरमधील हिंसाचाराबाबत सरकार गंभीर : केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकार अशा गुन्ह्यांना अत्यंत गंभीर मानते. याची गांभीर्याने दखल घेतली जावी तसेच जलद न्याय देखील मिळायला हवा, जेणेकरून त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होईल, असे सरकारने म्हटले आहे. सीबीआयचे विशेष तपास पथक (एसआयटी) आधीच मणिपूरमधील हिंसाचाराशी संबंधित इतर सहा प्रकरणांचा तपास करत आहे. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, एजन्सी मणिपूर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करेल. तसेच पीडित, त्यांचे कुटुंबीय आणि साक्षीदारांचे जबाबही घेतले जातील.

राज्यपालांची मदत केंद्रांना भेट : दुसरीकडे, मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी चुराचंदपूरमधील मदत केंद्रांना भेट दिली. त्या म्हणाल्या की, राज्यात शांतता केव्हा प्रस्थापित होणार असा प्रश्न लोक विचारत आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही समाजातील लोकांना एकमेकांशी बोलण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असते. यासाठी सर्व राजकीय पक्षांना मदत करण्यास सांगण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. विरोधी पक्षाच्या खासदारांच्या दोन दिवसीय मणिपूर दौऱ्याबाबत राज्यपाल म्हणाल्या की, 'मी त्यांना राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते आहे'.

हेही वाचा :

  1. INDIA Parties MPs Manipur visit: विरोधी आघाडीचा मणिपूर दौरा; 'इंडिया'चे 21 खासदार मणिपूरसाठी रवाना
  2. Manipur viral video : मणिपूरमधील महिलांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
  3. Manipur Violence : विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांचा करणार दौरा

ABOUT THE AUTHOR

...view details