इंफाळ- मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: रविवारी याबाबत माहिती दिली. मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कळत-नकळत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करणारे ट्विट त्यांनी केले आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह - मणिपूरचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह (वय ५९) सध्या गृह अलगीकरणात आहेत. मणिपूर राज्यात आत्तापर्यंत 21,636 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील 218 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे राज्य आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
इंफाळ
एका फेसबुक पोस्टमध्ये बीरेनसिंह यांनी लिहिले आहे की, "मित्रांनो, काही लक्षणे जाणवत असल्याने मी कोरोना विषाणूची चाचणी केली असून मला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह (वय ५९) सध्या गृह अलगीकरणात आहेत. मणिपूर राज्यात आत्तापर्यंत 21,636 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील 218 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे राज्य आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.