महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Manipur Election Result Updates 2022 : मणिपूरमध्ये भाजप आघाडीवर; बीजेपीला 25 तर काँग्रेसला 11 जागा - Manipur Assembly Seat Result live

मणिपूरमध्ये 60 जागांवर मतांची मोजणी सुरू झाली आहे. 60 पैकी 30 जागांवर चुरशीची स्पर्धा पाहण्यास मिळत आहे. 28 फेब्रुवारी 2022 आणि 5 मार्च 2022 रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. आता मणिपूरमध्ये बीजेपी एका जागेने आघाडीवर आहे. या निकालाकडे सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Manipur Election
Manipur Election

By

Published : Mar 10, 2022, 7:10 AM IST

Updated : Mar 16, 2022, 9:12 AM IST

हैदराबाद - मणिपूरमध्ये 60 जागांवर मतांची मोजणी ( Manipur Assembly Election Result ) सुरू झाली आहे. 60 पैकी 30 जागांवर चुरशीची स्पर्धा पाहण्यास मिळत आहे. 28 फेब्रुवारी 2022 आणि 5 मार्च 2022 रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. आता मणिपूरमध्ये बीजेपी 25 जागा, कॉंग्रेसला 11 जागा, एनपीपीला 13 तर जेडीयूला 5 इतर पक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत.

60 पैकी 36 विधानसभा मध्ये 90 पेक्षा जास्त मतदान

मणिपूर विधानसभेच्या 12 व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात 89.3% पेक्षा जास्त विक्रमी मतदान झाले. 10व्या आणि 11व्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अनुक्रमे 79.5% आणि 86.4% होती. एकूण 60 मतदारसंघांपैकी 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये 90% किंवा त्याहून अधिक मतदान झाले. एकूण 14565 मतदारांपैकी 90% पेक्षा जास्त मतदानासह (अपंग व्यक्ती) मतदारांचा प्रचंड सहभाग सार्वत्रिक निवडणुकीत दिसून आला आहे.

1949 ला विलीनीकरणावर केली स्वाक्षऱी

मणिपूरचा म्हणजे शाब्दिक अर्थ म्हणजे दागिन्यांची भूमी. देशाला स्वातंत्र्य असणारे संस्थान 1891 मध्ये ब्रिटिशांनी ते ताब्यात घेतले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातून ब्रिटीश राजवट संपताच 11 ऑगस्ट 1947 रोजी मणिपूर भारतात विलीन झाले. 21 सप्टेंबर 1949 रोजी मणिपूरच्या राजाने विलीनीकरणाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.

राज्यात बीजेपीची सरकार

राज्यात सध्या बीजेपीची सरकार आहे. बीजेपीपुढे सत्ता कायम राखण्याचे आव्हान आहे. 2022 मध्ये भाजपने राज्यात 40 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याआधी 2017 च्या निवडणुकीत भाजपला येथे केवळ 21 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे भाजपला 60 सदस्यांच्या विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा अवलंब करावा लागला होता. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 28 जागा जिंकूनही राज्याच्या सत्तेतून हद्दपार व्हावे लागले होते. .

पांच राज्यांचा निकाल एका क्लिकवर

Last Updated : Mar 16, 2022, 9:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details