इंफाळ :मणिपूरमधील परस्थिती दिवसेंदिवस वाईट होताना दिसत आहे. लष्कर आणि नागरिकांमध्ये वाद होण्याची परत एक घटना घडली आहे. यावेळी महिलांचा जमाव आणि लष्कराच्या सैन्य आमने-सामने आले. महिलांच्या जमावामुळे सैन्याने पकडलेल्या कांगलेई यावोल कन्ना लूपच्या 12 अतिरिकेय्ांना सोडून द्यावे लागले आहे. परंतु 1200 पेक्षा अधिक महिलांनी सैन्याला घेराव घातला होता. या जमावाने सुरक्षा दलाने पकडलेल्या अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती. जमावाच्या मागणीवर सुरक्षा दल आक्रमक न होता त्या अतिरेक्यांना सोडून दिले.
शोध मोहीम : संरक्षण दलाच्या पीआरओच्या अधिकृत प्रेस रिलीज नुसार, या भागाला लष्कराने वेढा घातला आहे. मात्र सध्या कोणतेही ऑपरेशन सुरू नाही. 24 जून रोजी सकाळी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे इंफाळ पूर्व जिल्ह्यातील इथम गावात (अँड्रोपासून 06 किमी पूर्वेला) शोध मोहीम राबवण्यात आली होती. या शोध मोहिमेत सैन्याने युद्धात वापरलेली शस्त्रे, दारूगोळा आणि अनेक साधने जप्त केली. लष्कराने सांगितले की, स्थानिक लोकांची गैरसोय टाळण्यासाठी, विशिष्ट शोध सुरू होण्यापूर्वी परिसराची नाकेबंदी करण्यात आली.