महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mani Shankar Aiyar 2014 पासून आपल्याला अमेरिकेचा गुलाम असल्यासारखी वागणूक- मणिशंकर अय्यर - काँग्रेस वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर

काँग्रेस वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर म्हणाले, की गेल्या 7 वर्षांमध्ये आपण पाहत आहोत. अलिप्ततेची व शांतीची चर्चा नाही. आपल्याला अमेरिकेचे गुलाम असल्यासारखे (Mani Shankar Aiyer slammed Modi gov) वागविले जात आहे. चीनपासून संरक्षण द्या, अशी भीक मागितली जाते.

मणिशंकर अय्यर
मणिशंकर अय्यर

By

Published : Nov 23, 2021, 8:48 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. 2014 पासून आपल्याला अमेरिकेचे गुलाम असल्यासारखे वागविले जात असल्याची टीका मणिशंकर अय्यर(Congress leader Mani Shankar Aiyer) यांनी केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

काँग्रेस वरिष्ठ नेतेमणिशंकर अय्यर म्हणाले, की गेल्या 7 वर्षांमध्ये आपण पाहत आहोत. अलिप्ततेची व शांतीची चर्चा नाही. आपल्याला अमेरिकेचे गुलाम असल्यासारखे (Mani Shankar Aiyer slammed Modi gov) वागविले जात आहे. चीनपासून संरक्षण द्या, अशी भीक मागितली जाते. 2014 नंतर रशियाबरोबरच्या संबंधावर (India USA relation) परिणाम झाले आहेत. ते मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले आहेत.

हेही वाचा-UTS Mobile App : लोकल प्रवाशांसाठी उद्यापासून मोबाईल तिकिटींग अॅप युटीएस सुरू

कंगना रनौतनेही भारतीय स्वातंत्र्याबाबत केले होते वादग्रस्त विधान

बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौत (Actress kangana ranaut)नुकतेच म्हणाली होती, की भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते. ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले', अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगणा रनौतने एका कार्यक्रमात उधळली. कंगणाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात आला आहे. कंगणाला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

हेही वाचा-संबित पात्रांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details