मंगलुरू :मंगळुरू येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींना बुरखा घालून एका लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर नृत्य ( Dancing In Burqa ) करताना दाखवणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात ( Mangaluru Students Suspended ) आले. सोशल मीडियावर17 सेकंदांच्या डान्स क्लिपला 'अयोग्य आणि अश्लील' म्हटल्यानंतर सेंट जोसेफ इंजिनीअरिंग कॉलेजने ( St. Joseph's College of Engineering ) विद्यार्थ्यांवर त्वरीत कारवाई केली. प्राचार्य रिओ डिसोझा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही चार विद्यार्थिनींना निलंबित केले आहे, जे मुस्लिम समुदायातील आहेत.
Dancing In Burqa : बुरखा घालून डान्स करणे पडले महागात,अभियांत्रिकीचे चार विद्यार्थ्यी निलंबित - Dancing In Burqa
मंगळुरू येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थिनींना बुरखा घालून ( Dancing In Burqa ) एका लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर नृत्य करताना दाखवणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित ( Mangaluru Students Suspended ) करण्यात आले.
![Dancing In Burqa : बुरखा घालून डान्स करणे पडले महागात,अभियांत्रिकीचे चार विद्यार्थ्यी निलंबित Dancing In Burqa](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17155397-thumbnail-3x2-burkha.jpg)
चार विद्यार्थ्यांना निलंबित
बुरखा डान्स केल्याप्रकरणी इंजिनीअरिंगच्या चार विद्यार्थ्यांना निलंबित
बुधवारी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी अचानक स्टेजवर आले आणि एका गाण्यावर नाचू लागले. बुधवारी रात्री उशिरा ही डान्स क्लिप सोशल मीडियावर फिरू लागल्याने अनेकांनी त्याला 'बुरखा का मजाक' असे म्हटले आहे. महाविद्यालयाने ट्विट केले की हा नृत्य मंजूर कार्यक्रमाचा भाग नव्हता आणि प्रलंबित चौकशीपर्यंत विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.