हैदराबाद : जुनून आणि बुनियाद या मालिकांमधून गाजलेले अभिनेते मंगल ढिल्लन यांचे आज कर्करोगाने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर लुधियानाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि पंजाबी चित्रपटाचा निर्माता मंगल ढिल्लन यांच्या निधनाची बातमी ऐकून मन दुःखी झाले. अनेक प्रेक्षक त्यांचा आकर्षक आवाज आणि अभिनयाला मुकणार आहेत. चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा धक्का आहे.
ढिल्लन हे पंजाबमधील फरीदकोट येथील राहणारे होते. त्यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या जगात स्वत:चे नाव निर्माण केले होते. त्यांनी काही वर्षे नवी दिल्ली आणि मुंबई येथे व्यावसायिक व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले. दूरदर्शन आणि रेडिओ नाटकातून आपली प्रतिभा दाखवून दिली. मंगल ढिल्लन यांनी टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करून प्रेक्षकांची मनपसंती मिळविली. त्यांच्या निधनानंतर अनेकज प्रेक्षक, चाहते व अभिनेते-अभिनेत्री सोशल मीडियातून तीव्र शोक व्यक्त करत आहेत.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मंगल सिंग यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले, की मंगल सिंग ढिल्लन हे सकाळी 1.30 वाजता घरी परतण्यासाठी निघाले आहेत. त्यांना शांती आणि आनंदाचा मिळो. ओम शांती! वाहे गुरु सतनाम- अभिनेत्री मीता वशिष्ठ
या सिनेमात व मालिकांमध्ये काम केले:1986 च्या बुनियाद या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांच्या लुभाया रामच्या भूमिकेची चांगलीच प्रशंसा झाली. रेखा काम करत असलेल्या 1988 च्या खून भरी मांग या चित्रपटात त्यांनी वकिलाची भूमिका केली. 1993 मध्ये जुनून या मालिकेतदेखील काम केले. 2000 मध्ये नूरजहाँ या टेलिव्हिजन मालिकेतही अकबराची भूमिका साकारली होती. स्वर्ग यहाँ, प्यार का देवता, रणभूमी, नरक यहाँ, विश्वात्मा, दिल तेरा आशिक आणि ट्रेन टू पाकिस्तान हे त्यांचे काही प्रमुख चित्रपट होते.