नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन भारत सरकारने 6 देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुधारित कोविड मार्गदर्शक (Revised Covid Guidelines) तत्त्वे जारी केली आहेत. आता चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान या 6 देशांतून भारतात येणाऱ्या लोकांसाठी RT PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. (Mandatory RT PCR Test). सुधारित कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार, लोकांनी विमान प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तास आधी RT PCR चाचणी करणे आवश्यक आहे. जगाच्या विविध भागांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती रुग्णसंख्या तसेच 6 देशांमध्ये SARS-CoV-2 प्रकार आढळून आल्याच्या अहवालात हे निर्णय घेण्यात आले आहेत. (RT PCR Test for passengers travelling to India).
Mandatory RT PCR Test : 'या' देशांतील नागरिकांना भारतात येण्यापूर्वी RT PCR चाचणी निगेटिव्ह दाखवणे बंधनकारक - RT PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल अनिवार्य
भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने असे म्हटले आहे की, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान येथून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी RT PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल अनिवार्य असेल, (Mandatory RT PCR Test) जो त्यांना विमानतळावर दाखवावा लागेल. लोकांनी विमान प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तास आधी RT PCR चाचणी करणे आवश्यक आहे. (RT PCR Test for passengers travelling to India).
कोविड गाइडलाइन्समध्ये या गोष्टींचा उल्लेख :भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने असे म्हटले आहे की, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान येथून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी RT PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल अनिवार्य असेल, जो त्यांना विमानतळावर दाखवावा लागेल. मंत्रालयाने सांगितले की, एअरलाइन्सना त्यांच्या चेक-इन वर्किंग कपॅसिटीत काही बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांनी एअर सुविधा पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे, तसेच ज्यांनी सेल्फ-डिक्लियरेशन फॉर्म म्हणजेच स्व-घोषणापत्र सादर केले आहे, अशा चीनसह सहा देशांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच बोर्डिंग पास जारी करण्याचे निर्देश आहेत.
प्रवाशांना दाखवावा लागणार 'सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म' : मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, "चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान येथून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हवाई सुविधा पोर्टल 'सेल्फ डिक्लेरेशन' ची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे." ज्यामध्ये परदेशातून भारतात येणाऱ्या या प्रवाशांसाठी RT PCR नकारात्मक चाचणी अहवाल तसेच 'सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म' अपलोड करण्याची परवानगी देण्यात आली आहे.