योगशास्त्रानुसार, या ग्रहावरील प्रत्येक जीवमात्रास ताजेतवाने होण्यासाठी रात्री लागणारी झोप हे नैसर्गिक औषध आहे. त्यामुळे प्रत्येकाने रात्री झोपले पाहिजे. शरिराचे घड्याळ अशा रितीने बनवलेले असते की, त्याचे चलनवलन पुन्हा होण्यासाठी त्याला पुरेशी झोप आवश्यक असते आणि शरिराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी तसेच ताजेतवाने होण्यासाठी गाढ झोपही आवश्यक आहे. ईटीव्ही भारत सुखीभव टीमने फिजिओथेरपिस्ट, अल्टरनेटिव्ह मेडिसिन प्रॅक्टिशनर आणि योग शिक्षक डॉ. जान्हवी कोठरानी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी काही मनोरंजक गोष्टींवर प्रकाश टाकला. निद्रानाश विकारात झोप न लागणे, झोपेचा कालावधी कमी असणे किंवा झोप पूर्ण झाली तरीही ताजेतवाने न वाटणे ही लक्षणे दिसतात.
पुरेसे तास झोप घेतल्यावरही व्यक्तिचे डोळे तारवटलेले दिसतात. ताजेपणाचा अगदीच अभाव असलेली जाणीव आणि सकाळीच जाणवणाऱ्या थकव्याचा संबंध निद्रानाशशी लावता येऊ शकतो. दिवसभर जाणवणारी झोपेची गुंगी आणि अस्वस्थता ही निद्रानाशाचीच चिन्हे आहेत. काही काळ मेंदू अगदीच काम करत नाही, असे वाटू लागते. निद्रानाशामुळे काहीवेळा, शरिरातील स्नायूंमध्ये ताठरपणा आल्याचेही जाणवू लागल्याचे नमूद केले गेले आहे.
• तीव्र; निद्रानाश सुरूवातीच्या अवस्थेमध्ये आठवड्यातून एक दोन रात्री झोप न लागल्याने किंवा एक महिनाभर झोपेचा अभाव किंवा नीट झोप न लागल्यामुळे असतो. या प्रकारचा विकार आरोग्य आणि जीवनशैलीत बाधा आणत नाही किंवा आणू शकतो. दोन्ही शक्यता असतात.
• जुनाटः हा आठवड्यात तीन ते चार रात्रr झोपेविना काढल्यावर किंवा तीन महिन्यांपासून किवा त्यापेक्षा जास्त मनुष्य झोपेविना तळमळत राहिला तर जुनाट विकार समजला जातो. त्यामुळे आरोग्य आणि जीवनशैलीच बिघडून जाते. झोपेचा मुख्य उद्देष्य हा शरिर आणि मनाला त्याने अधिक चांगल्या रितीने काम करावे म्हणून त्याला विश्रांती देण्याचा असतो तसेच पुरेशा प्राणवायुच्या पुरवठ्याने शरीर तसेच शरीरातील अंतर्गत चयापचय प्रक्रिया पुन्हा ताजीतवानी व्हावी हा असतो. झोपेच्या चक्रात कोणताही किरकोळ बिघाड झाला तरीही तो सुयोग्य व्यावसायिकाशी संपर्क साधण्यासाठी धोक्याचा इशारा
असतो. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व प्राचीन योगिक साहित्य आणि पुस्तकांमध्ये योगाच्या माध्यमातून झोपेच्या प्रमाणात कशी सुधारणा घडवून आणता येते, याचा उल्लेख केला आहे. आहारा-विहारः योग्य आहार योग्य वेळी सेवन करणे आणि जेवणाच्या वेळा पाळणे यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. तुम्ही जो मनात विचार आणता तोच मनाचे अन्न असते ज्याची योग्य वेळी झोप लागण्यात महत्वाची भूमिका असते आणि यासाठी मनाची सकारात्मकता आणि स्वतःची मानसिकता यावर काम करण्याची गरज आहे.