नागाव - तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचा ( fake ONGC officer ) उच्चस्तरीय अधिकारी असल्याचा भासविणाऱ्या आरोपीला आसाम पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपीने थेट आसाम महिला पोलीस उपनिरीक्षकालाही फसविले आहे. मात्र, या महिला पोलीस उपनिरीक्षकाला संशय आला. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने थेट तपास करत होणाऱ्या पतीला अटक केली आहे.
अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी आसाम पोलिसांच्या महिला उपनिरीक्षकाने ( Sub Inspector of the Nagaon Sadar ) आरोपीला अटक केली आहे. नागावचे उपनिरीक्षकाच्या कुटुंबियांना आरोपीने ओएनजीसी अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. काही काळापासून पोलीस उपनिरीक्षक जोनमनी रवा ( sub inspector Jonmani Rava ) या राणा पगागबरोबर ( Rana Pagag ) नातेसंबंधात होत्या. या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकणार होते. तथापि, त्याचे संशयास्पद वर्तन लक्षात घेऊन, जोमनी यांनी राणाकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना असे आढळले की तो कधीही ओएनजीसीमध्ये नोकरीला नव्हता. राणा हा मुळातच फसवणूक करणारा असल्याचे लक्षात आले.
सापळा रचून अटक- ओएनजीसीकडून आकर्षक कराराचे आश्वासन देऊन त्याने वेगवेगळ्या लोकांकडून पैसे उकळल्याचे जोमनी यांनी तपासात आढळले. जोनमनी यांनी थेट राणाला पोलीस ठाण्यात बोलावले. तासाभराच्या चौकशीनंतर त्याने कबूल केले की तो ओएनजीसीशी संबंधित नाही. बनावट ओएनजीसी ओळपत्र वापरून तो लोकांची फसवणूक करत होता. पोलीस उपनिरीक्षक जोनमनी यांनी सांगितले, की आम्ही त्याच्या ताब्यातून ओएनजीसीचे अनेक बनावट शिक्के ( fake ONGC identity card ) आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. राणाने फसवणूक केल्याची काही लोकांकडून माहिती मिळाली होती. त्यांनतर सापळा रचला होता, असे जोनमनी यांनी सांगितले.