लखनौ- सौदी अरेबियामध्ये नोकरी करण्यासाठी अनेक अकुशल कामगार जातात. मात्र, तिथे त्यांचे अनेकदा हाल होतात. अशीच स्थिती दर्शविणारा वाहनचालकाचा व्हिडिओ समोर आला आहे. या वाहन चालकाने सौदी अरेबियामधून मायदेशी परतण्यासाठी कळकळीची विनंती केली आहे.
रुखसार खान हे उत्तर प्रदेशमधील पदार्थपूर गावांमधील रहिवाशी आहेत. वाहन चालकाची नोकरी करण्याकरिता रुखसार हे चार वर्षांपूर्वी सौदी अरेबियामध्ये गेले. मात्र, तिथे त्यांना अनेकक अडचणींना सामोरे जावे लागल्याची आपबीती त्यांनी व्हिडिओमधून सांगितली आहे.
हेही वाचा-डॉक्टरांवरील हिंसाचाराविरोधात 10 लाख डॉक्टरांचे शुक्रवारी निषेध आंदोलन
उपाशीपोटी फुटपाथवर घालविल्या रात्री-
नोकरीत घेणाऱ्या मालकाने 'काफील' असे संबोधून पासपोर्ट आणि व्हिसा हिसकावून घेतल्याचे खान यांनी व्हिडिओमध्ये सांगितले. तसेच मालकाने वेतन देण्यासही नकार दिला आहे. हातात पैसे नसल्याने तहानेने व्याकुळ आणि भुकेल्या स्थितीत त्यांना पार्क आणि फुटपाथवर अनेक रात्री काढल्या आहेत.