शाहजहांपूर ( उत्तरप्रदेश ) : तिल्हारच्या पिप्रौली गावात राहणारे ६० वर्षीय कुबेर गंगवार यांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय स्मशानभूमीवरून परतल्यानंतर गावातील तरुणाने कुबेर यांचे शीर चितेतून बाहेर काढत कापले. तंत्र मंत्रासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले ( tantra mantra in shahjahanpur ) आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले ( MAN TOOK HEAD OF ELDERLY MAN AFTER CREMATION )आहे.
शीर कापून गेला घरी घेऊन :एसपी ग्रामीण संजीव कुमार यांनी सांगितले की, कुबेर गंगवार यांच्या निधनानंतर मंगळवारी दुपारी 12 वाजता शेतात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. चिता थंड झाल्यावर हे कुटुंब शेतातून परतले. दरम्यान, गावातील उपेंद्र उर्फ गोपी दारूच्या नशेत आला. त्याच्यासोबत आणखी दोन मित्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिघांनी चितेची लाकडे काढून कुबेर गंगवार यांचे शीर बाहेर काढले. उपेंद्र कापलेले शीर घेऊन घरी गेला.