मधेपुरा - बिहारमधील मधेपुरा येथील एका 84 वर्षीय वयोवृद्धाने असा दावा केला आहे की त्याने एक दोन वेळा नाहीत तर 11 वेळा कोरोना लसीकरण ( Elderly Got 11 Doses Of Corona Vaccine In Madhepura ) केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना लसीकरणाचा फायदा झाला आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा-पुन्हा लसीचे डोस घेतले. तर काही दिवसापूर्वी तो लस घेण्यासाठी चौसा पीएससी केंद्रावर गेला होता. मात्र लसीकरण बंद झाल्यामुळे त्याला 12 वा लसीचा डोस घेता आला नाही.
11 वेळा घेतले लसीचे डोस -
ब्रह्मदेव मंडल यांचे आधार कार्डवर वय 84 वर्ष आहे. ते पोस्ट विभागात काम करत होते. आता ते सेवानिवृत्त असून गावाकडे राहतात. त्यांच्या माहितीनुसार, त्यांनी पहिला लसीचा डोस हा 13 फेब्रुवारी 2021 ला घेतला होता. तेव्हापासून 30 डिसेंबर 2021 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 11 डोस घेतले आहेत. मंडल यांनी लसीचा डोस घेतलेली माहिती संपूर्ण सविस्तर एका कागदावर लिहिलेली आहे.