महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnatakas Crime News: मारहाण करून आधी पत्नीच्या प्रियकराचा चिरला गळा..नंतर 'ड्रॅक्युला'प्रमाणे त्याने पिले मानवी रक्त - कर्नाटक गुन्हे न्यूज

कर्नाटकात पशुंना लाजवेली अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने भांडणात दुसऱ्या व्यक्तीचा गळा चिरून घशातून रक्त पिले. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Karnatakas Crime News
कर्नाटक गुन्हे न्यूज

By

Published : Jun 26, 2023, 9:55 AM IST

Updated : Jun 26, 2023, 10:04 AM IST

बंगळुरू :बॉलीवूड चित्रपटांमध्ये मे तेरा खून पी जाऊंगा असा डायलॉग तुम्ही ऐकला असेल. पण, प्रत्यक्षात असे एका व्यक्तीने केले आहे. कर्नाटकातील चिक्कबल्लापूरमध्ये एका व्यक्तीने क्रूरपणाची हद्दच ओलांडली आहे. त्याने दुसऱ्या व्यक्तीचा निदर्यतेने गळा चिरला. त्यानंतर नरड्यातील रक्त पिले आहे. ही घटना पाच दिवसांपूर्वी घडली आहे.

आश्‍चर्याची बाब म्हणजे ज्या व्यक्तीचे रक्त पिले ती व्यक्ती जिवंत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेला व्यक्ती हा आरोपीच्या पत्नीचा प्रियकर असल्याची माहिती समोर येत आहे. पत्नीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे आरोपी खूप संतापला होता. त्यामुळे दोघांमध्ये कमालीचा वाद झाला. पण, या वादाचे रुपांतरण एवढे टोकाला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र, या घटनेने चिक्कबल्लारपूर एकच खळबळ उडाली आहे.

मदत करण्याऐवजी केली व्हिडिओ शूटिंग-मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी तालुका बाटलाहल्ली येथील रहिवासी असलेल्या विजयने चार दिवसांपूर्वी चेलूर तालुक्यातील माडेमपल्ली येथील रहिवासी मरेश यांच्यावर अचानक हल्ला केला. विजयने चाकूने मारेशचा गळा चिरल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यानंतर विजयने मारेशच्या घशातून रक्त पिण्याचा प्रयत्न सुरू केला. एवढेच नाही तर गळा चिरूनही विजयने त्याला मारहाण सुरुच ठेवली. तर दुसरीकडे मारेश जखमी अवस्थेत जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करत राहिला. त्याला वाचविण्याऐवजी घटनास्थळी असलेल्या व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ तयार केला.

व्हायरल व्हिडिओनंतर आरोपीला अटक:दोघांच्या कुटुंबियांमध्ये काही घरगुती कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाद झाल्याने वचपा काढण्यासाठी विजयने मरेशला चिंतामणी तालुक्यातील सिद्धेपल्ली येथे बोलावून घेतले होते. मारेश तेथे पोहोचल्यानंतर कौटुंबिक वादातून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हे प्रकरण इतके वाढले की संतापलेल्या विजयने थेट चाकू काढून मारेशचा गळा चिरला. मारेश खाली पडताच विजय त्याच्याजवळ वेगाने गेला. त्याच्यावर ओरडून घशातून रक्त पिऊ लागला. या घटनेविरोधात केंचरलाहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आरोपी विजयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा-

  1. Thane Crime: उसनवारीतून रेल्वेच्या टीसीसह आणखी एका व्यक्तीची सर्पदंश देऊन हत्या
  2. Thane Police : डोंबिवली नशामुक्त करण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम; दोन तासात ५० जणांवर कारवाई
Last Updated : Jun 26, 2023, 10:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details