हैदराबाद :मांचलमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला लैंगिक गुन्ह्यांपासून विशेष संरक्षण कायदा (पॉक्सो) न्यायालयाने ( hyderabad POCSO Court ) गुरुवारी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश हरीशा यांनी मंचलचा रहिवासी दुसारी राजू उर्फ कटम राजू या आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला 20,000 रुपयांचा दंडही ठोठावला.( 20 Year Imprisonment For Sexually Assaulting )
4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार : ही घटना 2016 ची आहे. मंचल पोलिसांना 5 फेब्रुवारी रोजी एका 24 वर्षीय तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त झाली, ज्यामध्ये तिने सांगितले की, कटम राजूने तिच्या 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मांचल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कटम राजूने मुलीला पैसे देण्याच्या बहाण्याने जवळच्या घरात नेले आणि ती खेळत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.