कंधमाल (ओडिशा): Man Jailed for Raping Minor Girl: कंधमाल जिल्ह्यातील Kandhamal of odisha फुलबनी येथील पोक्सो न्यायालयाने गुरुवारी एका व्यक्तीला 2020 मध्ये एका 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी 25 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा Man sentence to 25 years jail सुनावली. बामुनीगाव पोलीस स्टेशन परिसरातील गणेश बेहेरदली उर्फ लिटू असे आरोपीचे नाव jail for raping 5 year old girl आहे.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-सह-विशेष न्यायाधीश संजीत कुमार बेहरा यांनी बेहेराडेलीला 22,000 रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास त्याला आणखी 18 महिने कारावास भोगावा लागणार आहे. न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून पीडितेला सहा लाख रुपये देण्याचे निर्देश दिले.