बंगळुरु - कर्नाटकाच्या चमराजनगरमधील गुंडलुपेटमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाला निर्दयीपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचं समजतं. पतीने पत्नीच्या प्रियकराला ठार केले.
बसवशेट्टी (वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शिवन्ना आरोपीचे नाव आहे. बसवशेट्टीचे शिवन्नाच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध होते. बुधवारी रात्री शिवन्नाने पत्नी आणि तिचा प्रियकर दोघांनाही एकत्र पकडले. रागाच्या भरात शिवन्नाने बसवशेट्टीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.