महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रियकरासह पत्नी गेली सौदी अरेबियात पळून पतीने 3 मुलांना विष पाजून केली आत्महत्या - पतीने 3 मुलांना विष पाजून केली आत्महत्या

कर्नाटकातील एकाने तीन मुलांना विष पाजले. त्यानंतर त्यानेही विष घेतले man kills self. त्यात त्याचा मृत्यू झाला तर मुलांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची पत्नी सौदी अरेबियात प्रियकराबरोबर गेली poisons 3 children after wife elopes with lover. तिथून तिने व्हिडिओ कॉल करुन पतीला मजा करत असल्याचे दाखवले होते wife elopes with lover in Saudi Arabia.

प्रियकरासह पत्नी गेली सौदी अरेबियात पळून
प्रियकरासह पत्नी गेली सौदी अरेबियात पळून

By

Published : Aug 19, 2022, 10:16 AM IST

तुमकुरु कर्नाटक जिल्ह्यातील एकाने गुरुवारी आपल्या तीन मुलांसह विष घेतल्याची धक्कादायक घटना घडली. त्याची पत्नी सौदी अरेबियात प्रियकरासह पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना तुमकुरू जिल्ह्यातील पीएच कॉलनीत घडली.

समिउल्लाअसे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विष घेतल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या तीन मुलांची प्रकृती गंभीर आहे poisons 3 children after wife elopes with lover. ती बेंगळुरू येथील रुग्णालयात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत समिउल्लाची पत्नी साहिरा बानू ही त्याला सोडून प्रियकरासह सौदी अरेबियाला न सांगता गेली होती wife elopes with lover in Saudi Arabia.

साहिरा सौदी अरेबियामध्ये मोलकरीण म्हणून काम करत होती. पोलिसांनी सांगितले की, साहिराने तिच्या पतीला कथित व्हिडिओ कॉल केले आणि ती सौदी अरेबियामध्ये तिच्या प्रियकरासोबत वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करत असल्याचे दाखवले. पोलिसांनी पुढे सांगितले की, साहिराने तिच्या प्रियकरासह एकत्र राहण्याच्या कथित व्हिडिओंद्वारे तिच्या पतीची टिंगल केली आणि ती घरी परतली नाही. तिच्या पतीने रडून तिला परत येण्याची विनंती केल्यानंतरही ती परत आली नाही.

समिउल्लाने आपल्या तीन मुलांना सांगितले होते की त्यांची आई कधीही परत येणार नाही. त्यानंतर त्याने त्यांना विष दिले. नंतर त्याने स्वतः विष घेतले. समिउल्लाला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची गळफास लावून केली आत्महत्या, चेंबूर कॅम्पात खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details